फोटो सौजन्य - royalchallengers.bengaluru
दिनेश कार्तिक : भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिक लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेश कार्तिकला आयपीएलमध्ये असो किंवा भारतीय संघासाठी असो हा खेळाडू नेहमीच भारतासाठी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्याचबरोबर दिनेश बऱ्याच काळासाठी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळला आहे. त्याचबरोबर त्याने संघातील महत्वाची विकेट किपरची भूमिका सुद्धा बजावली आहे. नुकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यावर असे समजते की दिनेश कार्तिक लवकरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा बॅटिंग कोच होणार आहे.
दिनेश कार्तिकवर आरसीबीच्या मॅनेजमेंटने महत्वाची जबाबदारी दिली आहे. आयपीएल २०२५ मध्ये दिनेश लवकरच प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. आयपीएल २०२४ मध्ये दिनेश कार्तिकने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्याला बॅटिंग कोच आणि मेंटॉरची भूमिका साकारायची आहे. त्याची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. पण आता कार्तिक एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आरसीबीसोबतच कार्तिक आयपीएलमध्ये इतर संघांसाठी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा उत्कृष्ट विक्रम आहे.
दिनेश कार्तिकचा व्हिडीओ शेअर करून त्याखाली कॅप्शन लिहिण्यात आले आहे की, आमचे नवे बॅटिंग प्रशिक्षक आणि मार्गदर्शक दिनेश कार्तिक आरसीबीवर आमची 12 वी मॅन आर्मी जितकी प्रेम करते तितकेच प्रेम करतो. आमच्यासोबत त्याच्या नवीन खेळीपूर्वी त्याच्याकडे एक खास संदेश आणि चाहत्यांसाठी आणखी खास वचन आहे! अशी पोस्ट करून प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. आरसीबीसोबतच कार्तिक आयपीएलमध्ये इतर संघांसाठी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा उत्कृष्ट विक्रम आहे.