फोटो सौजन्य - Netflix सोशल मीडिया
नीरज गोयत : भारतीय बॉक्सर नीरज गोयत नुकताच नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध शो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये आला होता. यावेळी त्याने सांगितले होते की अमेरिकेमध्ये होणाऱ्या चॅम्पियनशिपचा तो भाग असणार आहे. आज त्याचा पहिला सामना झाला आणि त्याने कमाल करून दाखवली. आज त्याचा सामना लाईव्ह झाला या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याआधी अंडरकार्ड सुपर मिडलवेट लढतीत नीरज गोयतने भाग घेतला होता. यामध्ये निराजचा सामना ब्राझीलचा बॉक्सर व्हिंडरसन नुनेस विरुद्ध झाला होता. भारतीय बॉक्सरने चमकदार कामगिरी करत एकतर्फी लढतीत व्हिंडरसनचा पराभव केला. मुख्य कार्डापूर्वी दोघांमध्ये 6 फेऱ्यांची लढत झाली, जी नीरजने 59-55, 60-54, 60-54 अशी एकतर्फी जिंकली.
जागतिक बॉक्सिंग परिषद रँकिंगमध्ये स्थान मिळवणारा नीरज हा पहिला भारतीय बॉक्सर आहे. पहिल्या राउंडपासून नीरज गोयतने व्हिंडरसन न्युन्सवर त्याचा दबदबा दाखवला. त्याचे त्याचे वर्चस्व कायम ठेवले. नीरजने त्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक ठोसे मारले. त्याने 171 पंच मारले, तर नुनेस केवळ 87 पंच करू शकला. 33 वर्षीय भारतीय बॉक्सरने गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत.
Neeraj Goyat wins the first match of #PaulTyson in a unanimous decision. pic.twitter.com/1mI90Zqo8y
— Netflix (@netflix) November 16, 2024
नीरज गोयत त्याच्या पहिल्याच सामन्यात कमालीची कामगिरी करून दाखवली. त्याने गेल्या वर्षी फाकोर्न अम्योदविरुद्ध तांत्रिक बाद फेरीत विजय मिळवला होता. त्याचा प्रतिस्पर्धी न्युनेसने बॉक्सिंगमध्ये नुकतेच व्यावसायिक पदार्पण केले. याआधी तो सोशल मीडियावर प्रभाव टाकणारा होता. त्याने आतापर्यंत केवळ प्रदर्शनीय सामन्यांमध्येच भाग घेतला आहे.
जेक पॉल याने माईक टायसनच्या विजयावर त्यांनी आपली 8.4 कोटी रुपयांची संपत्ती पणाला लावली आहे. जर टायसन जिंकले असते तर त्याला बोलीच्या रकमेचा एक भाग देखील मिळाला असता. टायसनबद्दल सांगायचे तर तो 19 वर्षांनंतर रिंगमध्ये ते पुनरागमन करत आहेत आणि त्याला त्याच्या सामन्यासाठी किंवा त्याच्या लढतीसाठी 168 कोटी रुपये मिळणार आहेत. सोशल मिडीआयवर अनेक वृत्त समोर येत आहेत यामध्ये असे म्हंटले जात आहे की, जेक पॉलला टायसनपेक्षा दुप्पट पैसे दिले जात आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, जेक पॉलला भारतीय चलनांनुसार 337 कोटी रुपये दिले जात आहेत. भारतीय बॉक्सर नीरज गोयत हा हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील बेगमपूर गावचा रहिवासी आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
त्याने तीन वेळा WBC आशियाचे विजेतेपद पटकावले आहे. निरजने त्याच्या करियरची सुरुवात 2006 मध्ये बॉक्सिंगला केली आणि 2008 मध्ये युवा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक नावावर केले होते. येथूनच नीरजला जबरदस्त ओळख मिळाली आणि त्यानंतर त्याने 2015, 2016 आणि 2017 मध्ये सलग तीन वेळा WBC जागतिक क्रमवारीत आपले स्थान निर्माण केले. नीरजने त्याच्या करियरमध्ये आतापर्यंत 25 लढतींमध्ये भाग घेतला आहे, यामध्ये त्याने 19 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांमध्ये त्याला पराभवच सामना करावा लागला आहे, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. तो मुक्काबाज आणि तुफान यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसला आहे.