फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया
गस ॲटिंकसन : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या दोन्ही संघामध्ये तीन सामान्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचा हा दुसरा सामना आहे, पहिल्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पराभूत करून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेमध्ये दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिनी नवा विक्रम मैदानावर घडला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये तीन वर्षांनंतर हॅट्ट्रिक पाहायला मिळाली. हा पराक्रम इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ॲटिंकसन याने केला आहे. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरी कसोटी सुरू आहे, ज्यामध्ये इंग्लिश गोलंदाजाने हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने तीन चेंडूत न्यूझीलंडच्या शेवटच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
Gus Atkinson is FLYING! 🛫
☝️ 34.3 | Nathan Smith plays on
☝️ 34.4 | Matt Henry fends to gully
☝️ 34.5 | Tim Southee pinned in frontThe first cricketer EVER to take a Test hat-trick at the Basin Reserve. 👏 pic.twitter.com/P49cLnyKqh
— England Cricket (@englandcricket) December 6, 2024
आम्ही तुम्हाला सांगतो की, सुमारे तीन वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील ही पहिली हॅटट्रिक होती. याआधी, कसोटी क्रिकेटमधील शेवटची हॅट्ट्रिक 2021 मध्ये घेण्यात आली होती, जी दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकी गोलंदाज केशव महाराजने वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्ण केली होती.
गुस ॲटिन्सन हा इंग्लंडकडून कसोटीमध्ये हॅट्ट्रिक घेणारा 14 वा खेळाडू ठरला आहे. वेलिंग्टन येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात त्याने नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टिम सौदी यांना बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. इंग्लिश वेगवान गोलंदाजाने डावात हॅट्ट्रिकसह 4 बळी घेतले. ॲटिंकसनने हॅट्ट्रिकसह न्यूझीलंडला सर्वबाद केले.
इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये कहर केला आहे. यामध्ये इंग्लडच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर बेथेलने ९६ धावांची खेळी खेळली. तर बेन डकेटने ९२ धावांची खेळी खेळली आहे. हॅरी ब्रुकने संघासाठी ५५ धावांची खेळी खेळली तर रूट अजूनही संघासाठी अर्धशतक करून मैदानावर टिकून आहे.
ॲटिंकसनच्या हॅट्ट्रिकवेळी न्यूझीलंडचा संघ अवघ्या 125 धावांवर गारद झाला. यादरम्यान केन विल्यमसनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 3 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. ॲटिंकसनशिवाय ब्रेडन कार्सनेही इंग्लंडकडून 4 बळी घेतले. उर्वरित 1-1 विकेट ख्रिस वोक्स आणि कर्णधार बेन स्टोक्सला गेली.
उल्लेखनीय आहे की, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. हॅगले ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लिश संघाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात इंग्लंडसाठी चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज ब्रेडेन कारसे याला सामनावीराचा किताब देण्यात आला. या सामन्यात कार्सने एकूण 10 विकेट घेतल्या.