Photo Credit - Instagram
इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रुक यांनी त्याच्या लहानशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये त्याने टीम इंडियाच्या गोलंदाजांना हैराण करून ठेवले होते. आता त्याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. हॅरी ब्रुक याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी साखरपुडा उरकला आहे. ही माहिती त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या दीर्घकालीन गर्लफ्रेंड सोबत त्याने लग्न केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी इंग्लड मालिकेतील हॅरी ब्रुक यांने त्याची जुनी मैत्रीण लुसी लॉयल्स हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. हॅरी ब्रुक याची गर्लफ्रेंड हिच्या बाबतीत सोशल मीडियावर फार काही माहिती नाही पण हे दोघेही अहवालानुसार 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
🚨 Breaking the Internet — Not Just Records! 🏏 England’s white-ball captain Harry Brook (24), the explosive batter with a career T20 strike rate of 146+, just announced his engagement to longtime love Lucy Lyles 💍. The power couple, together since 2020, shared the news on… pic.twitter.com/9ATq7UuzVg — Yola Cricket | Cricket moments & updates instantly (@Yolacricket) October 8, 2025
हॅरी ब्रुक याची गर्लफ्रेंड लुसी लॉयल्स हिच्याबद्दल फारसे काही माहिती नाही पण ती मॅचेस्टर विद्यापीठातील पदवीधर आहे. खेळाडूंनी शेअर केलेल्या फोटो खाली त्याच्या हाताने शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएल 2023 मध्ये हॅरी ब्रुकने कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध शतक झळकावले होते यावेळी लुसी लॉयल्स ही देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. हॅरी ब्रुकने शेअर केलेला फोटोमध्ये या दोघांचीही चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाने आपल्या संघ जाहीर केला आहे या प्रमुख मालिकेसाठी टीम इंग्लंडचा कर्णधार असणारा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिकेला सुरुवात ही 21 नोव्हेंबर पासून होणार आहे. दोन्ही संघ हे आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये त्यांच्या वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाले आहेत. इंग्लंडमध्ये दमदार कमाल से खेळाडू पाहायला मिळतात त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघामध्ये देखील स्टार्क, मार्श सारखे दमदार खेळाडू आहेत.