Oh my! What the hell, Pakistan? It's a joke again! Fake football team arrested at airport to go to Japan
Pakistan fake football team in Japan : पाकिस्तान हा देश काही ना काही कारनामे करतच असतो. ज्यामुळे त्याला नेहमीच नाचक्कीला सामोरे जावे लागते. आता आशिया कपमध्ये (Asia cup 2025)भारताकडून पराभूत झालेला संघ तोंड दाखवू शकत नाही. हा पराभव जिव्हारी लागल्याने पाकिस्तानचे रडगाणे सुरू आहे. यातून ते आशिया कपवर बहिष्कार टाकत आहे. आता अशातच एक ताजी घटना जपानमध्ये घडली आहे. जिथे एक पाकिस्तानी फुटबॉल संघ एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. मात्र हा संघ बनावट असल्याचे आता उघड झाले आहे. या संघाचा विमानतळ सोडण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आणि हा संघच बनावट असल्याने आता थेट त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आणि नंतर त्यांना पाकिस्तानला त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आली आहे.
झाले असे की, हा संपूर्ण बनावट संघ जपानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना विमानतळावरील पोलिसांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यानंतर त्यांचे बिंग फुटले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशी नंतर हा संघ बनावट फुटबॉल खेळाडू असल्याचे सांगत जपानला आले होते असे उघड झाले आहे. त्यानंतर जपानी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला याबाबत माहिती दिली आणि संपूर्ण संघाला मायदेशी पाठवण्यात आले.
हेही वाचा : PAK vs UAE : मोठी बातमी ! भारताशी पंगा माहागात! पाकिस्तान Asia cup 2025 मधून बाहेर! PCB ची घोषणा
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जपान सरकारकडून एका बनावट पाकिस्तानी फुटबॉल संघाला परत पाठवण्यात आले आहे. या कृतीतून जपानकडून पाकिस्तानला इशारा देण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असून या सर्व व्यक्तींना फुटबॉल खेळाडू म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी जपान देशात पाठवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. जपानला पाठवण्याच्या बहाण्याने तस्करांकडून प्रत्येक व्यक्तीकडून अंदाजे ४ दशलक्ष रुपये लाटण्यात आले आहे.
अहवालांनुसार असे म्हटले जात आहे की, हे संपूर्ण प्रकरण मानवी तस्करी या प्रकरणाशी जोडलेले आहे. १५ सप्टेंबर रोजी, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या मलिक वकासला देखील अटक करण्यात आली आहे. वकासने “गोल्डन फुटबॉल ट्रायल” नाव असलेला एक बनावट फुटबॉल क्लबची नोंदणी केली होती आणि तो त्याचा वापर लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यासाठी करत आला आहे.
एफआयएच्या तपासामध्ये असे आढळून आले आहे की, आरोपीकडून सियालकोट विमानतळावरून २२ सदस्य असलेला एक बनावट फुटबॉल संघ जपानला पाठवण्यात आला होता. तथापि, हा संघ जपानमध्ये पोहचल्यानंतर अधिकाऱ्यांना कागदपत्रांमध्ये काही तफावत असल्याचे दिसून आले, त्यानंतर त्यांच्याकडून संघाला हद्दपार करण्यात आले आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा : Neeraj Chopra चा ‘थ्रो’ पात्रता फेरीच्या आरपार! ‘गोल्डन बॉय’ ची जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक
अहवालामध्ये असे देखील आहे की, संशय येऊ नये म्हणून या व्यक्तींना फुटबॉलपटू म्हणून प्रशिक्षण देण्यात आले होते. वकासने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनकडून बनावट नोंदणी पत्र तसेच परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील बनावट ना हरकत प्रमाणपत्र देखील तयार करून घेतले होते.