पाकिस्तान संघ(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धेतील आज १० वा सामना पाकिस्तान आणि युएई यांच्यात खेळला जाणार होता. परंतु, या समण्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. आज होणाऱ्या यूएईविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान खेळणार नसल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान संघाने आशिया कपवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी सोशल मीडियावर जिओ न्यूजचा हवाला देत वृत्त देण्यात आले आहे की, पाकिस्तानी संघाला हॉटेलमध्येच राहण्यास सांगितले आहे.
पाकिस्तान संघाकडून आशिया कप २०२५ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. आयसीसीकडून पाकिस्तानची मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेऊन स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान संघ आता २०२५ च्या आशिया कपमध्ये यूएईविरुद्धखेळताना दिसणार नाही.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, “मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याशी अलिकडेच झालेल्या हस्तांदोलन प्रकरणावरून पाकिस्तान संघाकडून आशिया कप २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या गट-स्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला एक ईमेल पाठवण्यात आला होता. या ईमेलमध्ये आशिया कपसाठी अँडी पायक्रॉफ्टला मॅच रेफरी म्हणून हटवण्याची विनंती करण्यात आली होती. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही विनंती फेटाळून लावली आहे. आयसीसीच्या एका सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, बुधवारी होणाऱ्या सामन्यासाठी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी म्हणून राहणार आहेत आणि जर पाकिस्तान खेळला नाही तर संयुक्त अरब अमिरातीला पूर्ण गुण देण्यात येतील.
आशिया कप २०२५ मधील आज १० वा सामना पाकिस्तान आणि युएई यांच्यात खेळवण्यात येणार होता. आजचा सामना हा दोन्ही संघासाठी करा किंवा मरा अशा परिस्थितीचा होता. दोन्ही संघांसाठी आजचा हा नॉकआउट सामना असणार होता, आजच्या सामन्यातील विजेत्या संघाला पूढील फेरीत जाण्याची संधी होती. तर पराभूत संघ स्पर्धेतून आबाद होणार होते. परंतु आता, पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्कार टाकल्याने यूएई संघ सुपर फोरमध्ये थेट पोहचणार आहे. त्यामुळे यूएई संघाला मोठी लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे.