National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व

मुंबईतील मालाड येथील आयएनएस हमला येथे सुरू झालेल्या पहिल्या युथ आर्टिस्टिक राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी सर्व्हिसेस आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. महाराष्ट्राच्या स्नितिक पाटीलने ऑल-अराउंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व
National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्वNational Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व
Published on: 
Updated on: 
  • पहिली युथ आर्टिस्टिक राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा

  • ज्ञानेश्वरला वैयक्तिक दोन विजेतेपद

  • महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

National Gymnastics Competition : मालाड येथील आयएनएस हमला येथे सुरू झालेल्या पहिल्या युथ आर्टिस्टिक राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सर्व्हिसेस आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी अनुक्रमे 'ग्रेड 7 आऊट-एज' आणि इतर गटांमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले.

दिवसाची सुरुवात 'ग्रेड 7 आऊट-एज' स्पर्धेने झाली. यात 'सर्व्हिसेस'च्या खेळाडूंनी सर्व उपकरणांवर सातत्यपूर्ण कामगिरी करत 146.866 गुणांसह सांघिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. पश्चिम बंगालने जोरदार आव्हान देत 732 गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर त्रिपुराने 136.267 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.

वैयक्तिक 'ऑल-अराउंड' अंतिम फेरीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. 'सर्व्हिसेस'चा सुदीप घोष आणि पश्चिम बंगालचा तन्मय मैत्रा या दोघांनाही 51.834 असे समान गुण मिळाले. मात्र, नियमांनुसार सुदीपला विजेता घोषित करण्यात आले आणि तन्मयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 'सर्व्हिसेस'च्या ज्ञानेश्वरने 51.199 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

ज्ञानेश्वरला वैयक्तिक दोन विजेतेपद

ज्ञानेश्वरने विविध उपकरणांवर आपली ताकद आणि संयम दाखवून दोन वैयक्तिक विजेतेपदे पटकावली. त्याने 'स्टिल रिंग्ज' प्रकारात 9.833 गुण मिळवले, तर 'पॅरलल बार्स' प्रकारात 8.933 गुणांची कमाई केली. दुसरीकडे, सुदीपने 'फ्लोअर एक्सरसाइज' प्रकारात अत्यंत प्रभावी आणि लयबद्ध कामगिरी करत 9.800 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तन्मयने आपली अष्टपैलू क्षमता सिद्ध करत 'पॉमेल हॉर्स' आणि 'हॉरिजॉन्टल बार' या दोन्ही प्रकारांत वर्चस्व गाजवत विजेतेपदे आपल्या नावे केली.

व्हॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत एक दुर्मिळ प्रसंग पाहायला मिळाला, जिथे हरियाणाच्या गौतमने आणि तेलंगणाच्या मोहम्मद मुर्तझा जिलानीने प्रत्येकी 9.200 गुण मिळवून संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले.

महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

'ग्रेड 7 इन-एज' स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 157.034 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. पश्चिम बंगाल 156.330 गुणांसह दुसऱ्या, तर महाराष्ट्र 150.867 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

वैयक्तिक 'ऑल-अराउंड' स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्नितिक पाटीलने बाजी मारली. त्याने विविध उपकरणांवर चपळता, ताकद आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करत 56.300 गुण मिळवून विजेतेपद पटकावले. पश्चिम बंगालचा सुप्रित चंदा 54.832 गुणांसह उपविजेता ठरला, तर उत्तर प्रदेशच्या मानस सिंगने 53.333 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

स्नितिकने आपला फॉर्म कायम राखत 'पॅरलल बार्स' प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने अत्यंत अचूक नियंत्रण आणि सहज हालचालींच्या जोरावर 9.867 गुण मिळवून आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले. सुप्रित चंदानेही 'हॉरिझॉन्टल बार' प्रकारात 9.300 गुणांसह विजेतेपद मिळवले. कर्नाटकच्या अगस्त्य बेल्लम कोंडाने 'व्हॉल्ट' प्रकारात 9.333 गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

आयएनएस हमला येथे पुरुषांच्या 'ग्रेड 8' गटातील जिम्नॅस्टिक्स स्पर्धा होणार असून त्या 26 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी वरिष्ठ व कनिष्ठ पुरुष गटासाठी निवड चाचण्या होतील. 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान महिलांच्या 'आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स' स्पर्धांचे आयोजन केले जाईल.