पुण्यात Taekwondo चा ‘सुवर्ण’ झंझावात; इंटरनॅशनल तायक्वांदोत भारताने राखले वर्चस्व

मुलांच्या कनिष्ठ गटातील ४५ किलो वजन प्रकारात हुसेन मिदोकने सुवर्ण, वेदांत पडवळने रौप्य, तर वेदांत कोरडे आणि ओम सावंत यांनी कांस्यपदक पटकावले.
पुण्यात तायक्वांदोचा ‘सुवर्ण’ झंझावात
‘इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप
Published on: 
Updated on: 
  • पुण्यात तायक्वांदोचा ‘सुवर्ण’ झंझावात

  • इंडिया इंटरनॅशनल तायक्वांदोत कनिष्ठ गटावर भारताचे वर्चस्व

  • मुला-मुलींच्या वजन गटांत पदकांचा पाऊस

Taekwondo: वेगवान किक्स, अचूक डावपेच, आक्रमक खेळ आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय युवा खेळाडूंनी पुण्यातील ‘इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये कनिष्ठ गटातही सुवर्णधडाका कायम ठेवला आहे. मुलांच्या आणि मुलींच्या विविध वजन गटांत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची (Pune) लयलूट करत यजमानांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

मुलांच्या कनिष्ठ गटातील ४५ किलो वजन प्रकारात हुसेन मिदोकने सुवर्ण, वेदांत पडवळने रौप्य, तर वेदांत कोरडे आणि ओम सावंत यांनी कांस्यपदक पटकावले. ४८ किलो गटात तनिष चौरसियाने सुवर्ण, बालमुरलीकृष्णनने रौप्य, तर अद्वैत रेडेकर आणि क्लिफोर्ड लुईरम यांनी कांस्यपदक मिळवले. ५१ किलो गटात लक्ष रावळने सुवर्ण, आयुष सिंगने रौप्य, तर विराज पिसाळ आणि सुजल चिखले यांनी कांस्यपदकाची कमाई केली. ५५ किलो गटात वंश सुधीरने सुवर्ण, तेजस यादवने रौप्य, तर अथर्व सावंत आणि अभी शर्मा यांनी कांस्यपदक जिंकले.

कनिष्ठ मुलींच्या गटातही भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. ४२ किलो वजन गटात रिया भाटकरने सुवर्ण, तमसीन शेखने रौप्य, तर वंशिका मोटाले आणि बुशरा हाश्मी यांनी कांस्यपदक पटकावले. ४४ किलो गटात अग्निशा अधातने सुवर्ण, लिया प्रकाशने रौप्य, तर कृष्णा दळवी आणि आर्या दास यांनी कांस्यपदक मिळवले. ४९ किलो गटात सई जाधवने सुवर्ण, स्मृती कुमारीने रौप्य, तर देवांशी खंडेलवाल आणि अखिला रेड्डी यांनी कांस्यपदक जिंकले. ५२ किलो गटात भूमिका चौहानने सुवर्ण, अस्मि कामठेने रौप्य, तर प्रशांति टमटा आणि वीराती बेडमुथा यांनी कांस्यपदक मिळवले.

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

५५ किलो गटात कफा अल मुबारकने सुवर्ण, स्वराली गोरडेने रौप्य, तर अश्विनी नेगीनेनी आणि ऐश्वर्या राठोड यांनी कांस्यपदक पटकावले. ५९ किलो गटात नागासाई आरुषी करेलाने सुवर्ण, अनिया कुमारीने रौप्य, तर जी. आर. त्रिशा आणि अपेक्षा मटकर यांनी कांस्यपदक मिळवले. ६३ किलो गटात भूमिका राणाने सुवर्ण, मनुजा गणेशनने रौप्य, तर तन्वी विटकर आणि अस्मि राणे यांनी कांस्यपदक जिंकले. ६८ किलो गटात याशिका नारूलाने सुवर्ण, टी. त्यांचीने रौप्य, तर अंगरिमा आणि किमया चिमणपुरे यांनी कांस्यपदक पटकावले. ६८ किलोवरील गटात कार्तिकी मिसाळने सुवर्ण, त्रिशा शेट्टीने रौप्य, तर साजथा रजाक आणि निया दोशी यांनी कांस्यपदक मिळवले. कनिष्ठ गटातील भारतीय खेळाडूंच्या या शानदार कामगिरीमुळे स्पर्धेत भारताचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे. युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवलेली गुणवत्ता, आत्मविश्वास आणि जिद्द भारतीय तायक्वांदोच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरत आहे.

५९ किलो गटात आहान सम्मेलने सुवर्ण, आर्यन सरकारने रौप्य, तर यथार्थ कदम आणि तोषित गुळवदे यांनी कांस्यपदक पटकावले. ६३ किलो गटात वीर झावरेने सुवर्ण, शर्विल मुळ्येने रौप्य, तर रुद्र खंडारे आणि रौनक राजसिंग सहानी यांनी कांस्यपदक मिळवले. ६८ किलो गटात खुशदिल सिंगने सुवर्ण, सुवनीश महिंद्रने रौप्य, तर अंश श्रीनिवासन आणि आदित्य पुजारी यांनी कांस्यपदक जिंकले.

७३ किलो गटात हर्ष पटेलने सुवर्ण, प्रभाव दीक्षितने रौप्य, तर अथर्वकुमार आणि अभिनव वर्मा यांनी कांस्यपदक मिळवले. ७८ किलो गटात विराज सिंगने सुवर्ण, अंकित सुनीलने रौप्य, तर गौरव चव्हाण आणि तेजस दास यांनी कांस्यपदक पटकावले. ७८ किलोवरील गटात शिवांक भारद्वाजने सुवर्ण, एकांश गुप्ताने रौप्य, तर अथर्व लाहकर आणि संजय कुमार यांनी कांस्यपदकाची कमाई केली.

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 'सुवर्ण' तर...; तब्बल 28 पदकांची कमाई

Q

इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ कुठे आयोजित करण्यात आली?

A

इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले.

Q

इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी कशी कामगिरी केली?

A

भारतीय युवा खेळाडूंनी कनिष्ठ गटातील मुलांच्या आणि मुलींच्या विविध वजन गटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी केली.