Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचे जय शाहंवर गंभीर आरोप; अमित शाह यांचे नाव घेत केले गंभीर

  • By युवराज भगत
Updated On: Nov 13, 2023 | 03:58 PM
Former Sri Lanka captain Arjun Ranatunga

Former Sri Lanka captain Arjun Ranatunga

Follow Us
Close
Follow Us:
श्रीलंकेच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप : श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जय शाह श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत, असा मोठा आरोप अर्जून रणतुंगा यांनी केला आहे. २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकातील श्रीलंकेच्या टीमच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रणतुंगा यांनी ही टीका केली आहे.
श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त केले
श्रीलंकेतील डेली मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन रणतुंगा म्हणाले, “श्रीलंका क्रिकेटचे अधिकारी आणि जय शाह यांच्या संबंधांमुळे बीसीसीआयला असं वाटतं की, ते श्रीलंकेचं क्रिकेट नियंत्रित करू शकतात. जय शाह श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत. जय शाह यांच्या दबावामुळे श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त होत आहे.”
“वडील गृहमंत्री म्हणून जय शाह शक्तीशाली”
“भारतातील एका व्यक्तीमुळे श्रीलंकेच्या क्रिकेटचं हे नुकसान होत आहे. जय शाह हे केवळ त्यांचे वडील अमित शाह भारताचे गृहमंत्री आहेत म्हणून इतके शक्तीशाली आहेत,” असंही अर्जून रणतुंगा यांनी म्हटलं.
श्रीलंकेचा संघ २०२५ मधील चॅम्पियन ट्रॉफीसाठीही पात्र नाही
मागील काही दिवसांमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेच्या टीमचं वाईट प्रदर्शन झालं आहे. गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ नवव्या क्रमांकावर खाली आला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ २०२५ मधील चॅम्पियन ट्रॉफीसाठीही पात्र ठरला नाही.
श्रीलंकेच्या क्रिडामंत्र्यांकडून क्रिकेट मंडळ बरखास्त
या कामगिरीनंतर श्रीलंकेचे क्रिडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट मंडळ बरखास्त केलं. तसेच श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जून रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखालील एक हंगामी समिती नेमली. मात्र, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने क्रिडामंत्र्यांच्या या निर्णयाला १४ दिवसांची अंतरिम स्थगिती दिली.
आयसीसीकडून श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाचं निलंबन
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सरकारकडून क्रिकेट प्रशासनात जास्त हस्तक्षेप होतोय असं कारण देत आयसीसीने श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केलं होते.

Web Title: Former sri lanka captain arjun ranatunga made serious allegations against jay shah naming amit shah nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 03:58 PM

Topics:  

  • BCCI Secretary Jay Shah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.