Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रांसच्या खेळाडूचा टी२० मध्ये विश्वविक्रम! ‘या’ पराक्रमाने क्रिकेट विश्वालाही केले चकित..

फ्रान्सच्या झहीर झहिरी या खेळाडूने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विश्वविक्रम केला आहे. त्याने धावांचा यशस्वी पाठलाग करताना १० किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीवर येऊन सर्वात मोठी खेळी खेळी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 12, 2025 | 04:30 PM
French player's world record in T20! 'This' feat also surprised the cricket world..

French player's world record in T20! 'This' feat also surprised the cricket world..

Follow Us
Close
Follow Us:

France’s Zaheer Zaheer sets world record : क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये दिवसागणिक वेगवेगळे विक्रम रचले जातात. तर काही विक्रम मोडले देखील जातात. खेळाडूंकडून अनेकदा मैदानात आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे अनेकदा नघण्यात येते.अशाच प्रकारे क्रिकेट जगताला धनिक देणारी कामगिरी फ्रान्सच्या एका खेळाडूने केली आहे. फ्रान्सच्या झहीर झहिरी या खेळाडूने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करताना १० किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी खेळून विश्वविक्रम रचला आहे. स्वीडनविरुद्धच्या सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करताना झहीर झहिरीने ३४ धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

झहीर झहिरीने मोठी कामगिरी केलीय आहे. त्याने आता टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक खेळी खेळणारा १० किंवा त्याखालील क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. असे करून झहीरने पाकिस्तानच्या नसीम शाह आणि बेल्जियमच्या सज्जाद अहमदझाई यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

हेही वाचा : अबब! याला काय अर्थ? तब्बल १० फलंदाज शून्यावर बाद; ‘या’ संघाने २ चेंडूत साकारला टी२० सामन्यात विजय..

२०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तानच्या नसीम शाहने १० व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नाबाद १७ धावांची खेळी केली होती. त्याच वेळी, बेल्जियमच्या सज्जाद अहमदझाईने स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात १० व्या क्रमांकावर यशस्वी धावांचा पाठलाग करत नाबाद १७ धावा केल्या होत्या.

टी२० मध्ये यशस्वी पाठलाग करताना १० व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी धावा

  1. ३४* – झहीर झहीरी (फ्रान्स) विरुद्ध स्वीडन, २०२५
  2. १७* – सज्जाद अहमदझाई (बेल्जियम) विरुद्ध स्वित्झर्लंड, २०२४
  3. १४* – नसीम शाह (पाकिस्तान) विरुद्ध अफगाणिस्तान, २०२२
  4. १४* – जुनैद खान (पोर्तुगाल) विरुद्ध जिब्राल्टर, २०२३
  5. १३* – बिलावल भट्टी (पाकिस्तान) विरुद्ध झिम्बाब्वे, २०१५

हेही वाचा : Asia cup 2025 साठी टीम इंडियाचा संघ कसा असेल? कोणाची लागणार वर्णी? कोण जाणार बाहेर? जाणून घ्या…

वायकिंग कप २०२५ मधील तिसऱ्या स्थानासाठीचा प्ले ऑफ खूपच रंजक पद्धतीने संपला, फ्रान्सने स्टॉकहोममधील बोटकीर्का क्रिकेट सेंटरमध्ये फक्त पाच चेंडू शिल्लक असताना स्वीडनवर दोन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात स्वीडनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी बाद १५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर फ्रान्सने शेवटच्या षटकात दोन गडी राखून सामना आपल्या नवे करण्यात यश मिळवले. फ्रान्सकडून १० व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन झहीर झहिरीने १६ चेंडूत ३४ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले.

Web Title: Frances zaheer zaheer sets world record in t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 04:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.