स्टम्प(फोटो-सोशल मीडिया)
Senior Women’s T20 Tournament : क्रिकेट सामन्यांमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी विक्रमांची झडी लागते तर कधी विक्रमांचा दुष्काळ असतो. कधी अशी काही एक घटना घडते की ते पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. टी-२० सामन्यात अशा अनेक घटना घडत असतात. कधी एखाद्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला जातो तर कधी एक एखादा संघ कमी धाव संख्येवर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. असाच काहीसा प्रकार टी-२० सामन्यात पाहायला मिळाला आहे. तर एका महिला टी-२० सामन्यादरम्यान एक अजबच प्रकार घडलाय आहे, जिथे एका संघाच्या १० फलंदाज भोपळा न फोडतात माघारी परतले. परिणामी या संघाला मोठी धाव संख्या उभारू शकला नाही. त्यामुळे विरोधी संघ फक्त २ चेंडूत सामना जिंकला आहे.
हेही वाचा : डेव्हिड वॉर्नरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये केला पराक्रम
हा सर्व प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशन राज्याच्या वरिष्ठ महिला संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या निवडीसाठी जयपूर आणि उदयपूर जिल्हा केंद्रांवर राज्यस्तरीय वरिष्ठ महिला टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिकर आणि सिरोही जिल्ह्यांच्या संघांमध्ये खेळवण्यात आला होता. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ मानले जाते. जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात सिरोही संघाच्या बाबत असाच प्रकार घडला आहे. सिरोहीच्या संघाची अवस्था खूप बिकट झाली होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सिरोहीच्या संघाची अवस्था वाईट झाली होती. या संघाच्या एकामागून एक विकेट जात राहिल्या. या दरम्यान धावफलकावर धावा तेव्हा लागल्या होत्या जेव्हा मैदानावर ९व्या क्रमांकाचा फलंदाज आला. त्याने २ धावा काढल्या. तसेच त्या व्यतिरिक्त २ धावा अतिरिक्त धावांमधून आल्याया आहेत. उर्वरित १० फलंदाजांच्या नावांसमोर फक्त शून्य लिहिले दिसून आले.
हेही वाचा : Asia cup 2025 साठी टीम इंडियाचा संघ कसा असेल? कोणाची लागणार वर्णी? कोण जाणार बाहेर? जाणून घ्या…
एकूणच, सिरोहीचा संघ फक्त ४ धावाच करू शकला. प्रत्युत्तरादाखल, ५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला सिकरचा संघ फक्त २ चेंडू खेळून त्यांचे लक्ष्य साध्य केले. आणि अशाप्रकारे, महिलांच्या टी-२० सामन्यात सिरोही संघाला सिकरकडून १० विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले.