Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

French Open 2025 : ‘हा माझा शेवटचा सामना..’, पराभव लागला जिव्हारी, Novak Djokovic चे निवृत्तीचे संकेत.. 

फ्रेंच ओपन २०२५मध्ये यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत जोकोविच म्हणाला की हा माझा शेवटचा सामना असू शकतो.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 07, 2025 | 03:06 PM
French Open 2025: 'This is my last match..', defeat was painful, Novak Djokovic hints at retirement..

French Open 2025: 'This is my last match..', defeat was painful, Novak Djokovic hints at retirement..

Follow Us
Close
Follow Us:

French Open 2025 : फ्रेंच ओपन २०२५ मध्ये दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचचा प्रवास संपुष्टात आला आहे.  जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा पराभव करत  स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यानिक सिनरने जोकोविचला सलग तीन सेटमध्ये ६-४, ७-५, ७-६ असे हरवून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात सिनरचा गतविजेत्या अल्काराझचे आव्हान असणार आहे. जोकोविचने परभवानंतर भावना व्यक्त केल्या.

सिनेरने हा सामना जिंकून पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तथापि, या खेळादरम्यान त्याने एकही सेट गमावला नाही. अंतिम सामना अल्काराझविरुद्ध असणार आहे. ज्याने गेल्या चार सामन्यांमध्ये सलग सिनरला हरवले आहे. अल्काराझ सिनेरपेक्षा ७-४ ने पुढे आहे. हा अंतिम सामना जिंकून सिनर त्याचा चौथा ग्रँड स्लॅम जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच वेळी, अल्काराझ त्याच्या पाचव्या ग्रँड स्लॅमवर पटकावण्याचे लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा : “भारत तुम चले चलो” भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network चा खास व्हिडीओ!

सिनरनचा धमाका..

सिनर शुक्रवारी बोलला की, ‘स्वतःसाठी सर्वोत्तम संधी निर्माण करतो आणि आता मला हे व्यासपीठ मिळाले आहे. सध्या माझ्यासाठी यापेक्षा कोणती मोठी संधी असू शकणार नाही. मी मानसिकदृष्ट्या तिथेच राहण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक गुण जिंकण्यासाठी कोणतीही कमी सोडली नाही.  फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सिनर हा दुसरा इटालियन पुरुष खेळाडू ठरला आहे.  त्याच्या आधी १९७६ चा चॅम्पियन अॅड्रियानो पनाट्टा अंतिम फेरीत दाखल झाला होता.

जोकोविच हा पुरुषांचा विक्रम २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता राहिलेला आहे, परंतु तो कोर्ट फिलिप चॅटियरवर सिनरच्या अचूक आणि वेगवान फोरहँडची बरोबरी करणायात कमी पडला.  या पराभवानंतर नोवाक जोकोविच म्हणाला की हा सामना त्याचा शेवटचा सामना असू शकतो, असे विधान केले आहे.

हा माझ्या कारकिर्दीतील शेवटचा सामना..

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत नोवाक जोकोविच थोडा भावुक दिसून आला.  तो म्हणाला की “आजचा सामना माझ्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, जो मी येथे खेळलो आहे. म्हणूनच शेवटच्या क्षणी माझ्या भावना थोड्या जास्तच ओसंडून वाहत आहेत.”

हेही वाचा : Ind vs Eng : भारतीय संघाने Tendulkar-Anderson Trophy साठी इंग्लंडभूमीवर ठेवले पाऊल; BCCI कडून Video शेअर..

जोकोविच पुढे म्हणाला की, “जर हा माझा शेवटचा रोलँड गॅरोस सामना असेल तर मी म्हणेन की तो खेळण्याचा अनुभव खूप छान होता. येथील ऊर्जा, प्रेक्षकांचा प्रेम आणि वातावरण यामुळे ते विशेष बनले आहे. मला पुन्हा येथे मैदानावर उतरायचे आहे, परंतु सध्या मला सांगता येणार नाही की, १२ महिन्यांनंतर मी पुन्हा खेळू शकेन की नाही.

Web Title: French open 2025 defeat in jivhari novak djokovic hints at retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 03:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.