French Open 2025 Final: Carlos Alcaraz dominates on red clay! He defeated Jannik Sinner to become the French Open champion for the second time.
French Open 2025 Final : तरुण स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्काराजने सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन जेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराजने दोन सेट गमावल्यानंतर गेममध्ये शानदार पुनरागमन केले आणि पाच सेटच्या सामन्यात जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिनरचा धुव्वा उडवाला. यासह त्याने आपले जेतेपदही कायम राखले आहे.
जागतिक नंबर दोन खेळाडू असणारा स्पेनचा कार्लोस अल्काराजने फ्रेंच ओपन २०२५ च्या ऐतिहासिक अंतिम फेरीत अव्वल मानांकित जॅनिक सिनरला पराभावाची धूळ चारली आहे. या विजयासह, अल्काराजचे हे पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे. तर सिनरच्या नावावर तीन ग्रँड स्लॅम जमा आहेत.
हेही वाचा : Rinku Singh आणि -Priya Saroj यांच्या साखरपुड्यात जया बच्चनचा संताप? सोशल मीडियावर फोटो व्हायरल..
अल्काराजने तीन मॅच पॉइंट वाचवत पाच तास आणि २९ मिनिटे चाललेल्या रोमांचक सामन्यात इटलीच्या सिनरचा ४-६, ६-७(४), ६-४, ७-६(३), ७-६(२) असा दणदणीत पराभव केला. या विजयासह, त्याने ग्रँड स्लॅममध्ये सिनरच्या सलग २० विजयांच्या विजयी मोहिमेचा विजयी रथ थंबवला. जगातील नंबर वन सिनरने २०२३ मध्ये यूएस ओपन आणि २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले आणि ग्रँड स्लॅम हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या उद्देशाने तो फ्रेंच ओपन स्पर्धेकडे वळला परंतु अल्काराज त्याच्या वाटेत आडवा आला आणि त्याने सिनरचे स्वप्न धुळीस मिळवले.
अल्काराजने आतापर्यंत कोणताही ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात हार पत्करलेली नाही. तर, सिनरला पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. २२ वर्षीय अल्काराजचा या वर्षी क्ले कोर्टवर विजय-पराजय रेकॉर्ड २२-१ असा झाला आहे. त्याने आठवा विजय नोंदवला ज्यामध्ये २३ वर्षीय सिनेरविरुद्ध सलग पाचवा विजय देखील समाविष्ट आहे. सिनेरने अल्काराजला चार वेळा धूळ चारली आहे.
चौथ्या सेटमध्ये अल्काराज पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता पण त्याने तीन मॅच पॉइंट्स वाचवत सामना निर्णायक सेटमध्ये खेचला आणि नंतर तो ७-६ असा जिंकून सामना आपल्या खिशात टाकला. पाचव्या सेटच्या टायब्रेकमध्ये, अल्काराजने चांगली सुरुवात केली, ७-० अशी मोठी आघाडी घेतली आणि नंतर सहज विजय खेचून आणला.
चौथ्या सेटमध्ये, अल्काराज ३-५ च्या गुणांनंतर ०-४० ने मागे पडला होता परंतु नंतर त्याने टायब्रेकरमध्ये ७-६ असा विजय मिळवत त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पिछाडीवर टाकले. अव्वल क्रमांकाचा खेळाडू सिनेरने पहिले दोन सेट ६-४, ७-६ ने जिंकले तर अल्काराजने तिसरा सेट ६-४ ने जिंकून सामन्यात त्याच्या पुनरागमनाचा पाया रचत विजय मिळवला.