रिंकू सिंग, प्रिया सरोज आणि जया बच्चन(फोटो-सोशल मीडिया)
Rinku Singh Priya Saroj’s engagement : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग सध्या चांगलाचा चर्चेत आला आहे. सद्या तो त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काल म्हणजेच ८ जून रोजी रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या तरुण खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडला आहे. हा भव्य साखरपुडा समारंभ लखनऊमधील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला आहे. ज्यामध्ये राजकीय आणि चित्रपट जगतातील अनेक मोठ्या व्यक्तींनी उपस्थिती या भव्य साखरपुड्याला दर्शवली होती. या समारंभात जया बच्चन संतापलेल्या दिसून आल्या आहे. त्यांचे फोटो देखील व्हायरल झाले आहे.
या खास प्रसंगी सपा प्रमुख अखिलेश यादव हे त्यांच्या पत्नी डिंपल यादवसोबत दिसून आले. अखिलेश यादव नेहमीप्रमाणे पारंपारिक पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये दिसले, तर डिंपल यादवने राखाडी रंगाची साडी परिधान केली आणि साधी आणि सुंदर लूक घातला होता.
हेही वाचा : AUS VS SA : कधी आणि कुठे पाहता येणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना मोफत! वाचा सविस्तर माहिती
या साखरपुड्याच्या पार्टीत बॉलिवूडमधील खास पाहुणे देखील हजर होते. अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन यांनीही या समारंभाला उपस्थिती दर्शवली होती. गुलाबी रंगाची साडी परिधान केलेल्या जया बच्चन यांनी प्रिया आणि रिंकूसोबत कॅमेऱ्यासमोर पोज देखील दिली. पण या काळात, नेहमीप्रमाणे, त्या रागावलेल्या दिसून आल्या. आता जया बच्चन यांचे रागावलेले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून काही यूजर्सनी बच्चन यांच्या हावभावांवर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने लिहिले की, “जयाजी इथेही रागावलेल्या दिसतात,” तर दुसऱ्याने खिल्ली उडवली, “आता जया बच्चनही आल्या आहेत, हे शुभ आहे!” असे लिहिले आहे.
जोडप्याच्या लूकबद्दल सांगायचे झाल्यास रिंकू सिंगने पांढऱ्या क्लासिक शेरवानी परिधान केली होती, ज्यामध्ये त्याचा लुक रॉयल दिसत होता. तर प्रिया सरोज गुलाबी लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने तिचा लूक स्टायलिश कॉलर नेकलेस, पारंपारिक बांगड्या आणि मधल्या भागात लावलेल्या कुरळ्या केसांच्या केशरचनाने पूर्ण केला होता. आता रिंकू आणि प्रियाच्या साखरपुड्याचे हे फोटो इंटरनेटवर तूफान व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांना खूप शुभेच्छा देखील देताना दिसस्त आहेत.