PBKS vs RCB: Absconding Mallya once owned RCB! Who is the owner of the team now? You will be shocked to hear about the assets..
PBKS vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल फायनल सामना होणार आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदा एक नवीन विजेता मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघांना फारच महत्वाचा असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या टी-२० फॉरमॅट क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात अद्याप एकही विजेतेपद जिंकलेले नाही. तरी देखील हा संघ नेहमीच चर्चेत राहतो. आरसीबी हा आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक मानला जात असतो. विराट कोहलीसारखे मोठे स्टार या संघामध्ये असल्याने हा संघ चर्चेत असतो. २००८ मध्ये या संघाची स्थापना करण्यात आली आहे.
आरसीबीची मालकी हक्क युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडे आहे. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ही जगातील आघाडीच्या मद्य उत्पादक कंपनी डायजिओ पीएलसीची उपकंपनी आहे.
२००८ मध्ये संघाची स्थापना : आरसीबीला विजय मल्ल्याने १११.६ दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले होते, ज्यामुळे तो त्यावेळी आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा संघ बनला होता.
२०१६ मध्ये मालकीमध्ये झाला बदल : विजय मल्ल्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने आरसीबीची पूर्ण मालकी हक्क घेतले.
अशी आहे सध्याची स्थिती : आरसीबी संघ आता डियाजिओ पीएलसी अंतर्गत युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मालकीचा आहे.
आरसीबी संघाने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज मंगळवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही दोन संघ आमनेसामने असणारा आहेत. या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी एक समारोप समारंभ होणार आहे. त्याची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ असणार आहे. यासाठी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. तथापि, त्यांचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. त्याबाबत माहिती आलेली नाही. संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवले जाणार आहे आणि या दरम्यान गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट देखील असणार आहे.