आरसीबी टीम(फोटो-सोशल मिडिया)
PBKS vs RCB Final Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल फायनल सामना होणार आहे. आयपीएल 2025 ला एक नवीन विजेता मिळणार आहे. दरम्यान, आरसीबीच्या एका स्टार खेळाडूशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबीचा स्टार खेळाडू फील फिल साल्ट बाबा बनला आहे. हा खेळाडू अलीकडेच त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी आपल्या मायदेशी गेला होता. त्यानंतर अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या उपलब्धतेबद्दल शंका उपयष्टि होऊ लागली होती. परंतु, आता हा खेळाडू भारतात परतला आहे.
या रोमांचक सामन्यापूर्वी, आरसीबीचा स्टार फलंदाज फिल साल्टने त्याच्या क्रिकेट निष्ठेने सर्वांची मनं जिंकले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, साल्ट त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी इंग्लंडला रवाना गेला होता आणि आज सकाळी अहमदाबादला परत आला आहे. तो २९ मे रोजी क्वालिफायर-१ सामना खेळला होता आणि त्यानंतर तो त्याच्या मायदेशी गेला होता. आरसीबीच्या प्रशिक्षण सत्रात तो दिसून न आल्याने त्याची अनुपस्थिती चाहत्यांमध्ये चिंतेचा विषय ठरली होती. पण, अहमदाबाद विमानतळावर त्याच्या पुनरागमनाने चाहत्यांच्या चिंता मिटल्या आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, एक खास विक्रम करण्याची संधी
आरसीबीच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी फिल साल्ट एक खेळाडू आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये १७५.९० च्या स्ट्राईक रेट आणि ३५.१८ च्या सरासरीने ३८७ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध त्याने २७ चेंडूत नाबाद ५६ धावांच्या त्याच्या वादळी खेळी केली होती. तेच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने १० षटकांत १०२ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. या खेळीत त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले होते.
हेही वाचा : IPL 2025 जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस! उपविजेत्या संघाला मिळणार इतकी रक्कम
सॉल्ट या हंगामात चांगला खेळताना दिसत आहे. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने अनेक सामन्यांमध्ये आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याच्या आणि विराट कोहलीच्या सलामी जोडीने प्रति षटक १०.२९ धावा केल्या आहेत, जे या हंगामात कोणत्याही संघाच्या सलामी जोडीमध्ये तिसरे सर्वात जलद ठरले आहे. साल्टने २२० चेंडूंपैकी १२४ धावांवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला असुन तेच त्याच्या आक्रमक शैलीचे प्रतिबिंब दर्शवते. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्यात सॉल्टचे पुनरागमन आरसीबीला दिलासा देणारे ठरणार आहे.