अहमदाबाद : काल जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट लिगची सुरुवात झाली. आयपीएलमध्ये (IPL 2023) सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सने (CSK) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांचं योगदान दिले. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईकडून मराठमोळ्या ऋुतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. तर गुजरातकडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर गुजरातने (Gujrat) हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 4 चेंडू राखून पूर्ण केलं. गुजरातने 19.2 ओव्हरमध्ये 5 बाद 182 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 63 धावा केल्या.
ऋतुराजचे दमदार अर्धशतक…
ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चांगलाच चमकला. ऋतुराजने या सामन्यात अर्धशतक करत आयपीएल २०२३ मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, अर्धशतक करत तो आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिले अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याचे शतक देखील होईल असे वाटत होते मात्र तो ५० चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईची सुरुवात जरा खराब झाली. संघाला १४ धावांवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाड याने एका बाजूने संघाची खिंड लढवत अर्धशतक पूर्ण केले.
गुजरातची विजयी सलामी…
गुजरात संघाने आपल्या घरच्या मैदानावर शुक्रवारी सलामी सामन्यात चार वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जला धूळ चारली. गुजरात टायटन्स संघाने १९.२ षटकांमध्ये ५ गड्यांनी सामना जिंकला. यासह गुजरात संघाला स्पर्धेत शानदार विजयी सलामी देता आली. यादरम्यान धाेनीच्या चेन्नई संघाला अटीतटीच्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. मात्र, या सामन्यादरम्यान चेन्नई संघाकडून सलामीला महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड (९२) आणि राजवर्धन हंगरगेकरची (३ बळी) कामगिरी लक्षवेधी ठरली.