
Gulveer singh won silver medal in asian games
भारताचा धावपटू गुलवीर सिंगने (Gulveer Singh) पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत ( men’s 10,000m event) २८ मिनिटे २९.३८ सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या कांस्य पदकाचे रौप्य पदकात रूपांतर केले. हांगझू येथे झालेल्या मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत गुलवीरने, २८ मिनिटे २७.५१ सेकंदांची वेळ नोंदवली होती.
२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगने भारतीय क्रीडा क्षेत्रात इतिहास रचला . त्याने ग्लासगो येथे पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत २७ मिनिटे ४९.७८ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले. त्यानंतर त्याने ५,००० मीटर शर्यतीत देखील कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते. एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकत त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला.
गुलवीर सिंगच्या कारकिर्दीची खरी सुरुवात २०२२ च्या फेडरेशन कपमध्ये झाली, जिथे त्याने १०,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकले. या विजयामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. त्यानंतर त्याने चीनमधील हांगझू येथे झालेल्या २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही पदक जिंकले. २०२४ मध्ये, गुलवीर प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्ज येथे गेला. प्रशिक्षक स्कॉट सिमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ एक नवीन विक्रम प्रस्थापित केले. त्याने ३००० मीटर, ५००० मीटर आणि १०,००० मीटरमध्ये भारतासाठी नवीन विक्रम प्रस्थापित केले. त्याचा ५००० मीटरचा विक्रम १२ मिनिटे ५९.७७ सेकंद, १०,००० मीटरचा विक्रम २७ मिनिटे ०.२२ सेकंद आणि ३००० मीटरचा विक्रम ७ मिनिटे ३४.४९ सेकंद आहे.