Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने रचला इतिहास; भारताच्या भुवनेश्वरचा ‘ऑल टाईम रेकॉर्ड’ काढला मोडीत; नवीन विक्रम रचला

Mohammad Amir CPL 2024 : उत्तर प्रदेशचा भेदक गोलंदाज म्हणून परिचित असलेला भुवनेश्वर कुमारचा 'ऑल टाईम रेकॉर्ड'  मोहम्मद आमीरने मोडीत काढला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद आमीरने टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधित निर्धाव षटक टाकण्याच्या यादीत भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. 

  • By युवराज भगत
Updated On: Sep 13, 2024 | 08:40 PM
Pakistan bowler Mohammad Amir has been brilliant in many matches so far

Pakistan bowler Mohammad Amir has been brilliant in many matches so far

Follow Us
Close
Follow Us:

Mohammad Amir CPL 2024 : पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अमीरने (Mohammad Amir) आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. सध्या मोहम्मद आमीर कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळत आहे. या लीगच्या एका सामन्यात त्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) विक्रम मोडला.

सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम मोडीत

मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक निर्धाव (Maiden Over) षटक टाकण्याच्या यादीत भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनच्या नावावर आहे. सुनील नरेनने 522 सामन्यांमध्ये 30 निर्धाव षटके टाकली आहेत. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. शाकिबने 444 सामन्यात 26 निर्धाव षटके टाकली आहेत.

मोहम्मद आमीरने भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे
निर्धाव षटके टाकण्याच्या यादीत भुवनेश्वर कुमार तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता मोहम्मद आमिर तिसरा क्रमांक पटकावला आहे. मोहम्मद आमिरने 302 सामन्यात 25 षटकं टाकली आहेत. तर भुवनेश्वर कुमारने 286 सामन्यात 24 निर्धाव षटके टाकली आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराहने 233 सामन्यात 22 निर्धाव षटके टाकली आहेत.

सामना कसा राहिला?
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्स आणि अँटिग्वा यांच्यात सामना खेळवण्यात आला. मोहम्मद आमीर अँटिग्वाच्या संघात आहे. या सामन्यात अँटिग्वाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. तर जस्टिन ग्रेव्हजने 61 धावा केल्या. सॅम बिलिंग्सने 56 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात बार्बाडोसचा संघ केवळ 127 धावा करू शकला. पण तरीही बार्बाडोसने डकवर्थ लुईस नियमानूसार हा सामना 10 धावांनी जिंकला. या सामन्यात मोहम्मद आमीरने 2.3 षटके टाकली. यादरम्यान त्याने 11 धावा दिल्या आणि एक निर्धाव षटक टाकले. मोहम्मद आमिरच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती कमालीची आहे. मोहम्मद आमीरने 302 टी-20 सामन्यात 347 विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद आमीरने 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या आहेत. आमिरने 61 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. या एकदिवसीय सामन्यात त्याने 81 विकेट्स घेतल्या आहेत. तर 36 कसोटी सामन्यात मोहम्मद आमीरने 119 विकेट्स पटकावल्या आहेत.

 

Web Title: History made by mohammad amir of pakistan indias bhubaneswars all time record has been broken a new record was set

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 08:40 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
2

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

रिंकुच्या साखरपुड्याला भुवनेश्वर कुमारने मारले ठुमके! पहा मजेशीर व्हिडीओ
3

रिंकुच्या साखरपुड्याला भुवनेश्वर कुमारने मारले ठुमके! पहा मजेशीर व्हिडीओ

RCB vs DC : Bhuvneshwar Kumar एक्सप्रेस सुसाट! पीयूष चावलाचा खास विक्रम काढला मोडीत, असे करणारा बनला एकमेव गोलंदाज.. 
4

RCB vs DC : Bhuvneshwar Kumar एक्सप्रेस सुसाट! पीयूष चावलाचा खास विक्रम काढला मोडीत, असे करणारा बनला एकमेव गोलंदाज.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.