ICC Womens T20 World Cup 2024 PAKW vs NZW Match With Pakistan's defeat, India is out of the Women's T20 World Cup
India Qualification Chances Womens T20 World Cup 2024 : महिला T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा न्यूझीलंड विरुद्ध 54 धावांनी पराभव झाला आहे. यासह भारतीय संघ विश्वचषकातूनही बाहेर पडला आहे. गेल्या रविवारी भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 9 धावांनी पराभव झाला होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला तरच टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
भारताचे स्वप्न भंगले
भारताला आजपर्यंत महिला टी-20 विश्वचषक जिंकता आलेला नाही. आता पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे. भारताने उपांत्य फेरीत जाण्याचे समीकरण असे बनले होते की, पाकिस्तानने न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत हरवले तरच ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकणार होते. परंतु पाकिस्तानचा संघ स्वतःही उपांत्य फेरीत पोहचला नाही आणि भारतालासुद्धा मदत केली नाही.
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर विजय
Through to the semi-finals in style 🤩
New Zealand become the second team after Australia to make the final four of the Women's #T20WorldCup 2024 🔥#PAKvNZ #WhateverItTakes pic.twitter.com/TRur6jHETT
— ICC (@ICC) October 14, 2024
पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा सामना
हा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता आणि दोघांनाही उपांत्य फेरीत स्थान पक्के करण्याची संधी होती. दुबईच्या संथ खेळपट्टीवर प्रथम खेळताना किवी संघाने 110 धावा केल्या. ही अगदी छोटी धावसंख्या आहे असे दिसते, पण खेळपट्टीची अवस्था अशी होती की, संपूर्ण पाकिस्तान संघ त्यातून केवळ अर्ध्या धावा करू शकला.
पाकिस्तानचा संघ अवघ्या 56 धावांवर गारद
न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 111 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तान संघाच्या विकेट पडण्याची मालिका दुसऱ्या षटकात सुरू झाली, त्यानंतर 28 धावा होईपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. एके काळी संघाने 5 विकेट गमावून 52 धावा केल्या होत्या, पण पुढच्या 4 धावांतच पाकिस्तानने उर्वरित 5 विकेट्सही गमावल्या. टीम इंडिया पाकिस्तानवर विसंबून असताना, त्यांचे 9 फलंदाज धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.