
फोटो सौजन्य - BCCI/England Cricket
भारत विरुद्ध इंग्लंड : T-२० विश्वचषक २०२४ चे (T-20 World Cup 2024) २७-२८ जून रोजी दोन्ही सेमीफायनलचे सामान करण्यात आले आहे. यासंदर्भात आयसीसीने आधीच स्पष्ट केले होते. २७ जून रोजी सकाळी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला होता. काही वेळातच भारत विरुद्ध इंग्लंड हा दुसरा सेमीफायनलचा सामना सुरु होणार आहे. या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यामध्ये सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या शहरात आज पावसाची दाट शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या संदर्भात आधीच स्पष्ट केले होते की सेमीफायनल एक साठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. परंतु दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्याऐवजी २५० मिनिटे राखीव ठेवण्यात आली आहेत. म्हणजेच ४ तास १० मिनिटे राखीव ठेवण्यात आली आहेत. मात्र या वेळेतही सामना शक्य नसेल तर तो रद्द सामना करावा लागणार आहे. आयसीसीने 2024 च्या T20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. मग आता चाहत्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडतो की आयसीसीने दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस का ठेवला नाही? आता खुद्द आयसीसीनेच याचे उत्तर दिले आहे.
आयसीसीनेच या संदर्भात स्वतः स्पष्ट केले आहे की, संघांना सतत प्रवास करावा लागू नये म्हणून दुसऱ्या उपांत्य फेरीत राखीव दिवस न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. ते म्हणाले, ‘संघांची कामगिरी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे संघांना सतत ‘खेळ-प्रवास-खेळ’ करावे लागू नये. दुसऱ्या सेमीफायनलसाठी अतिरिक्त वेळ (४ तास १० मिनिटे) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण हा सामना सकाळी १०.३० वाजता (वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार) सुरू होईल, तर पहिल्या उपांत्य फेरीची वेळ आहे. संध्याकाळ (एक दिवस आधी) म्हणजे एकाच दिवशी दोन्ही सामने अतिरिक्त वेळेत खेळणे शक्य होणार नाही त्यामुळे भारत आणि इंग्लंडचा सामना सकाळी १०.३० वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता होणार आहे. अशा परिस्थतीत पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता, जेणेकरून तो 27 जून रोजी होऊ शकेल. पण दुसऱ्या उपांत्य फेरीत हे शक्य नाही. जर दुसरा उपांत्य सामना राखीव दिवशी म्हणजेच 28 जून रोजी होणार असेल, तर हा सामना जिंकणाऱ्या संघाला दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 जून रोजी अंतिम सामना खेळण्यासाठी बार्बाडोसला जावे लागेल. त्यामुळे दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.