
IND A vs SA W: Before the South Africa series, Dhruv Jurel showed his spirit! Scored two consecutive centuries
IND A vs SA W, Dhruv Jurel century : युवा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने आपला फॉर्म कायम राखला आहे. दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने सलग दुसरे शतक ठोकले आहे. या शतकाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या कसोटीत नाबाद १३७ धावांची शानदार खेळी करणाऱ्या जुरेलने दुसऱ्या डावात देखील तोच फॉर्म कायम राखत शतक झळकावले, ज्यामुळे भारत अ संघ अडचणीतून बाहेर पडला आणि त्यांना मजबूत स्थितीत जाऊन पोहचला.
दुसऱ्या डावामध्ये, जेव्हा भारतीय संघ कठीण परिस्थितिमध्ये होता, तेव्हा ध्रुव जुरेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन त्याने पुन्हा एकदा जबाबदार खेळी करत संघाला आधार दिलला. त्याने आणि हर्ष दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी २५० चेंडूत १८४ धावांची शानदार भागीदारी रचली आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. या भागीदारीने सामन्याला वळण मिळाले. हर्ष दुबेने ११६ चेंडूत ८४ धावांची शानदार खेळी केली, यामध्ये त्याने १२ चौकार आणि १ षटकार मारला. दरम्यान, जुरेलने १५९ चेंडूत १३ चौकारांसह आपले दुसरे शतक पूर्ण करून तो नाबाद राहीला.
भारतीय अ संघाचा कर्णधार ऋषभ पंतने देखील दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत संघाला सावरले. तिसऱ्या दिवशी रिटायरिंग हर्ट असून देखील तो मैदानात परतला आणि आक्रमक धावा काढल्या. त्याने फक्त ५४ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. पंतकया खेळीने संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली.
भारत अ ने त्यांचा दुसरा डाव ७ बाद ३८२ धावांवर घोषित केला, दक्षिण आफ्रिका अ ला विजयासाठी ४१७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने बिनबाद २५ धावा केल्या आहेत. जॉर्डन हरमन १५ आणि लेसेगो सेनोकवणे ९ धावांवर नाबाद आहेत.
हेही वाचा : IND vs AUS 5th T20 : अखेरचा टी 20 सामना पावसाने धुतला! भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने मालिका विजय
ध्रुव जुरेलने सलग दोन शतके लगावून निवडकर्त्यांना एक इशारच दिल आहे. त्याने त्याच्या फलंदाजीने संघाला संकटातून वाचवलेच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत स्थान मिळवण्याचा दावा देखील अधिक मजबूत केला.