२८६ धावांच्या पाठलागात गायकवाडने ११७ धावांची शानदार खेळी केली. एकदिवसीय सामना हायलाइट्स- ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या बळावर, भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाचा ४ विकेट्सने पराभव…
दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेसमोर ४१७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात ध्रुव जुरेलने सलग शतक झळकवले आहे.
पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन विकेट्सने धूळ चारली आहे. या सामन्यात ऋषभ पंतने महत्वपूर्ण 90 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
तिसऱ्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करत होता, परंतु कर्णधार ऋषभ पंतच्या प्रभावी कामगिरीमुळे सामना चौथ्या दिवशी पोहोचला. या सामन्याचा निकाल २ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल.
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या पायाच्या दुखापतीमुळे पंत काही महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे.