IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट

रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये भारत एचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीत श्रीलंका एने ३१७ धावांचे लक्ष्य गाठत भारताचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट (फोटो सौजन्य : एक्स)
IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट (फोटो सौजन्य : एक्स)IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट (फोटो सौजन्य : एक्स)
Published on: 
Updated on: 
  • गोलंदाजीप्रमाणेच क्षेत्ररक्षणातही ढिसाळ कामगिरी

  • भारताच्या संघ निवडीबाबत अनेक चुका

  • श्रीलंकेच्या खेळाडूंची दमदार खेळी

IND A vs SL A : आधी गट फेरीत पाकिस्तान अन् नंतर सेमिफायनलमध्ये श्रीलंकेनं 8 विकेट्सनं केलेल्या पराभवानंतर भारत ए चे रायझिंग स्टार्स आशिया ट्रॉफीमधील आपले आव्हान संपुष्टात आले आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करत 8 बाद 317 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा बचाव करण्यास भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्याचमुळे श्रीलंकेनं या धावा 41.3 षटकात पूर्ण करत फायनलचं तिकिट मिळवलं.

संपूर्ण स्पर्धेत भारत चार सामने खेळला. त्यातील लिंबू टिंबू असलेल्या नेपाळ व युएई संघाविरुद्ध मोठा विजय मिळवत त्यांनी कसं तरी सेमिफायनल गाठले, पण पाकिस्तान असो वा श्रीलंका अशा संघांचा सामना करण्यास ते सपशेल फेल ठरले. त्यामुळे खरंच निवड समितीनं रायझिंग स्टार्स शोधलेत की, फॉलिंग स्टार्स असा प्रश्न निर्माण होत आहे.

संघात मोठ्या खेळाडूंचा भरणा

आश्चर्याची बाब म्हणजे, या संघात तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, हर्षित राणा व युएईविरुद्ध द्विशतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशी यासारख्या आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंचा भरणा होता. असंच काहीसे खेळाडू प्रतिस्पर्धी संघातही पाहण्यास मिळाले. पण निवड समितीने या खेळाडूंचा स्पर्धेसाठी विचार का केला? याचे उत्तर केव्हाच समोर आले नाही. तुल्यबळ संघांसमोरील या खेळाडूंची कामगिरी वगळता, प्रतिस्पर्धी अशा पाकिस्तान व श्रीलंकेचा ते सामना करू शकले नाहीत.

IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट (फोटो सौजन्य : एक्स)
Kho Kho Championship : चार गुणांनी हुकले सुवर्ण! कर्नाटककडून महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव

अभिषेक, तिलक आणि शाहबाजचे अर्धशतक

प्रथम फलंदाजीस आलेल्या भारत ए संघाची सुरुवात चांगली झाली. पण कमी चेंडूंत द्विशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी (40) बाद झाल्यानंतर मधली फळी पुन्हा ढासळली. सलामीला आलेला अभिषेक शर्माने 11 चौकार व एक षटकारच्या मदतीने 78 धावा केल्या, तर अचानक तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या तिलक वर्माने 53 आणि अष्टपैलू शाहबाद अहमदने 54 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून रविंदू फर्नांडो, जेनिथ लियांगे आणि निपून धनंजया यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.

IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट (फोटो सौजन्य : एक्स)
Olympic 2036 चे ऑलिम्पिक भारतात होणार? IOC समोर सादर केला सविस्तर आराखडा; सरकारकडून शर्थीचे प्रयत्न

श्रीलंकेचे फलंदाज चमकले

भारत ए नं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी कोणतीच चूक केली नाही. स्पर्धेत अपराजीत राहिलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. लसिथ क्रोस्पुल आणि सेनिथ जयवर्धने यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 174 धावांची भागादारी रचली. जयवर्धनेने 70 चेंडूंत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. तो डावातील शाहबादच्या 22 व्या षटकात तनुष कोटीयनकरवी झेलबाद झाला.

दरम्यान, महत्त्वाचा विकेट पडल्यानंतरही लसिथ डगमगला नाही, त्याने निशान मधुशंकाच्या साथीने संघाचा डाव पुढे नेला. तसेच लसिथने दणदणीत शतक झळकावत संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याने 107 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 116 धावा केल्या. त्याने मधुशंकाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर निशान मधुशंका (नाबाद 58 ) व कर्णधार पवन रथनायके (नाबाद 31 ) यांनी टिकून खेळत संघाला फायनलचं तिकिट मिळवून दिलं.