Olympic 2036 चे ऑलिम्पिक भारतात होणार? IOC समोर सादर केला सविस्तर आराखडा; सरकारकडून शर्थीचे प्रयत्न

Olympic 2036: भारताने 'फ्युचर होस्ट कमिशन'समोर आपले व्हिजन आणि सविस्तर आराखडा सादर केला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर सादर केला सविस्तर आराखडा
2026 चे ऑलिंपिक भारतात होण्याची शक्यता (फोटो- ai gemini)
Published on: 
Updated on: 
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर सादर केला सविस्तर आराखडा

  • २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताचे मोठे पाऊल

  • भारताच्या २०३६ ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याला अधिक बळकटी

Olympic 2036: पुढील ऑलिंपिक स्पर्धा 2036 मध्ये होणार आहे. ही स्पर्धा भारतात व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याचे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. भारताने 'फ्युचर होस्ट कमिशन'समोर आपले व्हिजन आणि सविस्तर आराखडा सादर केला आहे.

इंटरनॅशनल ऑलिंपिक समितीसमोर भारताने या स्पर्धेचा आराखडा सादर केला आहे. ही बैठक ऑनलाइन स्वरूपात पार पडली. भारतीय शिष्टमंडळाने क्रीडा क्षेत्राचा पायाभूत विकास, खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या सोयीसाठी आणि योग्य आयोजन याची सविस्तर माहिती समितीसमोर मांडण्यात आली आहे. भारताचा वाढता क्रीडा क्षेत्रातील दबदबा आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता यावर या सादरीकरणात विशेष भर देण्यात आल्याचे समोर येत आहे.

भारताचे Olympics 2036 च्या यजमानपदासाठी प्रयत्न! IOC ने दिल्या 'या' गोष्टी सुधारण्याच्या सूचना..

2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी भक्कम केली आहे. इंटरनॅशनल समितीच्या 'फ्युचर होस्ट कमिशन'समोर भारताने आपले सविस्तर सादरीकरण केले. हे सादरीकरण जवळपास अर्धा ते पाऊण तास चालले.

सादरीकरणानंतर IOC च्या 'फ्युचर होस्ट कमिशन'च्या नऊ सदस्यांसोबत भारतीय शिष्टमंडळाची सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या कमिशनचे अध्यक्षपद कोलिंडा ग्राबर-कितारोविच यांच्याकडे आहे. ऑलिंपिक 2036 चे आयोजन अहमदाबाद येथे करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे समोर येत आहे.

ऑलिम्पिक आयोजनासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केंद्र सरकार, गुजरात राज्य सरकार आणि अहमदाबाद प्रशासनाकडून मिळत असलेल्या भक्कम पाठबळाचा विशेष उल्लेख या समितीसमोर बैठकीत करण्यात आला आहे.

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा 'मास्टर प्लॅन'; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार

२०३६ ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत भारताला जर्मनी, हंगरी, कतर, साऊथ कोरिया, साऊथ आफ्रिका , तुर्किये या 6 देशांकडून आव्हान असणार आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, या शर्यतीतील एक प्रमुख दावेदार असलेल्या तुर्कियेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) 'फ्युचर होस्ट कमिशन'समोर आपले सादरीकरण आधीच सादर केल्याचे समजते आहे.

आज भारताने आपले सादरीकरण सादर केले आहे. आज झालेल्या या बैठकीत शिष्टमंडळात केंद्रीय क्रीडा मंत्री मानसुख मांडविया, क्रीडा सचिव हरी रंजन राव, पीटी उषा, नीता अंबानी, पीव्ही सिंधू हे दिग्गज उपस्थित होते.

Q

पुढील ऑलिम्पिक स्पर्धा कधी होणार आहे?

A

पुढील ऑलिम्पिक स्पर्धा २०३६ मध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भारतात व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

Q

भारतात २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?

A

भारताने ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठी 'फ्युचर होस्ट कमिशन'समोर आपले व्हिजन आणि सविस्तर आराखडा सादर केला आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर सादर केला सविस्तर आराखडा
अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा