

सेमिफायनल गाठण्यासाठी विजय महत्त्वाचा
युएईचा डाव हरप्रीतने सावरला
भारताचा अर्शद खान चमकला
IND A vs UAE : दोहा येथे पार पडत असलेल्या आयसीसी चषक रायझिंग स्टार्सच्या सामन्यात युनायटेड अरब अमिरात (UAE) यांनी प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 8 बाद 150 धावांचे आव्हान दिले. युएईच्या वतीने हरप्रीत सिंग भाटीया याने 130 धावांची दमदार खेळी केली. याही सामन्यात भारताचे गोलंदाज म्हणावे तसे चालले नाहीत. त्यामुळे युएईला 200 धावांचा आकडा पार करता आला.
तसं पाहता, भारताच्या वतीने चांगली सुरुवात झाली. भारताच्या गोलंदाजांनी सहाव्याच षटकात युएईला 20 धावांवर दोन धक्के दिले, मात्र येथून पुढे हरप्रीत सिंगची बॅट चालली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद शाहदाद (28) सोबत 71, तर एथन डिसोझा(25)सोबत चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली.
हरप्रीतने 144 चेंडूंत 12 चौकार व 4 षटकाराच्या मदतीने 130 धावा केल्या. तर कर्णधार बशील हमीदने 36 धावांचे योगदान दिले. त्यांनी संपूर्ण 50 षटक खेळत संघाच्या 8 बाद 259 धावा केल्या.
या सामन्यात प्रिन्स यादवच्या जागी अर्शद खानला (43/4)संघात जागा देण्यात आली. या संधीचं त्यानं सोनं केलं. त्याने सलामीचा अंश टंडन (8) आणि यष्टीरक्षक अफताब आलम (2) यांना जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. तर खेळपट्टीवर जम बसवलेल्या हरप्रीतचा काटाही अर्शदनेच 47 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड करत काढला. त्याच्या एक चेंडूनंतर त्याने इब्रार अहमदला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले.
हर्षित राणा (63/1) याही सामन्यात महाग ठरला. त्याने जरी एक विकेट घेतला असले तरी त्याने सरासरी 6.30 च्या रनरेटने धावा दिल्या. त्याच्यानंतर हर्ष दुबे (28/7), शाहबाज अहमद (23/1), श्रेयांश शेगडे ( 48/1) प्रत्येकी एक विकेट मिळवला.