Ind and Eng 2nd Test: Captain Shubman Gill's 'Nike vest' sparks controversy; BCCI will suffer a big blow..
Ind and Eng 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताची पकड चांगलीच पक्की झाली आहे. या सामन्यातदरम्यान शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध ४२७ धावांवर डाव घोषित केला. तिसऱ्या सत्रात, ड्रिंक्स ब्रेकची घोषणा होताच, ड्रेसिंग रूममध्ये गिल त्याच्या काळ्या नाईक व्हेस्टमध्ये दिसून आला. तिथून त्याने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरला परत बोलवून घेतले.
नाईक व्हेस्टसह दिसल्याने बीसीसीआयच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, सोशल मीडियावर याबाबत एक नवीन चर्चा रंगली आहे. गिलने घातलेली बनियान नाईके कंपनीची आहे. तर टीम इंडियाचा अधिकृत किट प्रायोजक अॅडिडास आहे. आता लोक सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, गिलचे हे पाऊल बीसीसीआयला न कळवता उचलण्यात आले आहे का? जर असे असेल तर त्याला काही अडचण येऊ शकते का? सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : सुरेश रैना चमकणार मोठ्या पडद्यावर; लगावणार अभिनयाचे चौकार-षटकार! तमिळ चित्रपटातून करणार पदार्पण; पहा Video
बीसीसीआय आणि आदिदास यांच्यात एक विशेष करार झाला आहे, जो मार्च २०२८ पर्यंत लागू असणार आहे. या करारानुसार, भारतीय संघाची जर्सी आणि इतर अधिकृत कपडे तयार करण्याचा अधिकार हा फक्त आदिदासलाच आहे. अशा परिस्थितीत, मैदानावर नायकेसारख्या दुसऱ्या कंपनीचे जॅकेट परिधान करणारा कोणताही खेळाडू हा या कराराचे उल्लंघन मानले जाऊ शकते.
Adidas paid BCCI ₹ 250 crores for a sponsorship deal. The Indian captain walks out to the balcony, wearing not the adidas jersey, but a NIKE T-SHIRT. pic.twitter.com/s52Rw87LX7 — Aman (@AmanHasNoName_2) July 6, 2025
आता प्रश्न निर्माण होऊ लागला आहे की, शुभमन गिलने हे जॅकेट मुद्दाम घातले आहे की, अनावधानाने चूक झाली आहे. कारण काहीही असले तरी, ही बाब बीसीसीआयच्या लक्षात येण्याची शक्यता आहे. कारण, ती त्यांच्या ब्रँड पार्टनर आदिदासच्या हिताशी जुळलेली आहे. सध्या, बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. परंतु, असे मानले जाते आहे की, बोर्ड लवकरच या संदर्भात खेळाडूंना मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करू शकते. जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये.
हेही वाचा : SL vs BAN : वनिन्दू हसरंगाने रचला इतिहास! एकदिवसीय सामन्यात केला ‘हा’ भीम पराक्रम..
बीसीसीआयसोबत कोटींचा करार
बीसीसीआयकडून जून २०२३ मध्ये आदिदाससोबत करार करण्यात आला होता. ज्यामध्ये आदिदासला भारतीय संघाची अधिकृत जर्सी आणि किट बनवण्याचे अधिकार देण्यात आले होते. हा नवीन अॅडिडास किट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीदरम्यान लाँच केला होता. अॅडिडासकडून बीसीसीआयला २५० ते ३०० कोटी देण्यात आले आहेत. अॅडिडास प्रति सामन्यासाठी बीसीसीआयला ७५ लाख रुपये देत आहे. दुसरीकडे, शुभमन गिल गेल्या काही महिन्यांपासून नायकेचा ब्रँड अॅम्बेसेडर राहिला आहे. हा एक वैयक्तिक करार असून अहवालांनुसार, तो अनेक कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे.