
Ind and Eng 2nd Test: India's victory is only 4 wickets away! England's situation is dire, Sundar's impressive batting along with Akash Deep..
Ind and Eng 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे सुरू आहे. याआधी इंग्लंडने लीड्स कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. एजबॅस्टनच्या सामन्यात भारताने मजबूत पकड निर्माण केली आहे. भारताने दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या दीड शतकाच्या जोरावर ४२७ धावा केल्या आहेत. भारताने आपला डाव ४२७ वर घोषित करून इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडची अवस्था वाईट झळले दिसून येत आहे. इंग्लंडने पाचव्या दिवशी लंचपूर्वी ६ गडी गमावून १५३ धावा केल्या आहेत. भारताला आता विजयासाठी केवळ ४ विकेट्सची आवश्यकता आहे.
हेही वाचा : Ind and Eng 2nd Test : कप्तान शुभमन गिलच्या ‘नाईक व्हेस्ट’मुळे उडाला गोंधळ; BCCI ला बसणार मोठा फटका..
तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या डावात ४२७ धावा केल्या आहेत. यामध्ये कर्णधार शुभमन गिलने मोठे योगदान दिले आहे. त्याने दुसऱ्या डावात शतक लगावले. त्याने १६२ चेंडूत १६१ धावा केलंय आहेत. यशस्वी जयस्वाल २८, केएल राहुल ५५, करुण नायर २६, ऋषभ पंत ६५, नीतेश रेड्डी १, रविद्र जाडेजा ६९ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर १२ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून फलंदाजांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करून भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडकडून जोश टंग आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर जो रूट आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी १ विकेट मिळाली.
चौथ्या दिवशी भारताने दिलेल्या ६०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरला. परंतु, इंग्लंडची सुरवात खराब झाली. सलामीवीर जॅक क्रॉलीला मोहम्मद सिराजने भोपळाही फोडू दिला नाही. त्याला शून्यावर बाद केले. त्यानंतर आकाश दीपने बेन डकेटचा त्रिफळा उडवला. डकेट २५ धावा करून बाद झाला आहे. त्यानंतर दीपने इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटला तग धरू दिला नाही. त्याला ६ धावांवर बाद केले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ३ गडी गमावून ७२ धावा केल्या होत्या.
पाचव्या दिवशी इंग्लंडने ७२ धावांवरून पुढे खेळायला सुरवात केली. तेव्हा मैदानात ऑली पोप आणि हॅरी ब्रूक खेळत होते. भारताच्या आकाश दीपने पाचव्या दिवशीही आपली कमाल दाखवली. त्याने ऑली पोप(२४) आणि हॅरी ब्रूक(२३) या दोघांना माघारी पाठवले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही जास्त वेळ तग धूर शकला नाही. त्याला वॉशिंग्टन सुंदरने ३३ धावांवर माघारी पाठवले. आता मैदानावर जीमी स्मिथ आणि ख्रिस वोक्स खेळत असून इंग्लंड ला अद्यापही ४५० धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी ४ विकेट्सची गरज आहे.
हेही वाचा : India and England 2nd Test : जो रूटची विकेट अन् रंगला वाद, पंचांकडून इंग्लंडची दिशाभूल?