टिम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. एजबॅस्टन येथे या मालिकेतील दूसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने दमदार कामगिरी केलीय सन या सामन्यावर भारताने चांगली पकड जमवली आहे. भारत या मालिकेत इतिहास रचण्याची शक्यता आहे. पाचव्या दिवशी(६ जुलै) इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी ५३६ धावांची गरज आहे. इंग्लंडच्या ५ विकेट गेल्या आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे दुसरा कसोटी सामना जिंकण्याची चांगली संधी चालून आली आहे. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज आकाश दीपने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस त्याने २ विकेट आपल्या नावावर केल्या होत्या तर पाचव्या दिवशी त्याने पुन्हा दोन विकेट्स मिळवल्या.
चौथ्या दिवशी त्याच्या २ विकेटपैकी एक विकेट ही दिग्गज फलंदाज जो रूटची देखील होती. जो रूट केवळ ६ धावा ,करू शकला. त्याला आकाश दीपने माघारी पाठवले. टीम इंडियासाठी ही खूप महत्वाची विकेट होती. पण, आता जो रूटच्या या विकेटवरून वाद उद्भवलेला दिसत आहे. अनेकांना असे वाटत आहे की, पंचांनी रूटला चुकीच्या पद्धतीने आऊट दिले आहे.
हेही वाचा : सुरेश रैना चमकणार मोठ्या पडद्यावर; लगावणार अभिनयाचे चौकार-षटकार! तमिळ चित्रपटातून करणार पदार्पण; पहा Video
एजबॅस्टन येथे खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटच्या विकेटची खूप चर्चा होऊ लागली आहे. ही चर्चा समालोचकाकडून सुरू करण्यात आली आहे. रूटची विकेट पडल्यानंतर, समालोचन करणाऱ्या अॅलिसन मिशेल म्हणाल्या की, “आकाश दीप गोलंदाजी करत असताना त्याचा पाय बाजूच्या क्रिजच्या मागे होता.” मिशेलच्या मते, आकाशचा पाय क्रिजच्या बाजूला २ इंच होता. यामुळे जो रूटला चुकीने बाद देण्यात आलेया आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
Akash Deep was that wide of the crease to create an angle to Joe Root; his backfoot was over the line and almost touched it! #ENGvsIND pic.twitter.com/vPwYTQuAFh — Saifullah Bin Anowar (@sbanowar44) July 5, 2025
त्यांचे हे विधान आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यानंतर चाहत्यांकडून असेही नमूद करण्यात आले आहे की, पंचांनी जो रूटला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केले. अशा परिस्थितीत, पंचाची ही चूक टीम इंडियासाठी भेट वस्तूच ठरली. लोक म्हणतात की पंचांच्या या निर्णयानंतर इंग्लंड संघाची दिशाभूल झाली आहे.
हेही वाचा : SL vs BAN : वनिन्दू हसरंगाने रचला इतिहास! एकदिवसीय सामन्यात केला ‘हा’ भीम पराक्रम..