Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs BAN: दुसऱ्या टेस्टमध्ये पावसाचीच ‘बॅटिंग’; सामना रद्द झाल्यास भारत WTC फायनल खेळू शकणार का? समीकरण पहाच

भारत आणि बांग्लादेश यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना भारताने मोठ्या दिमाखात जिंकला आहे. तसेच दूसरा सामना देखील सुरू झाला आहे. मात्र या सामन्यात पावसाचा व्यत्यय येत आहे. आजदेखील पावसामुळे दुसऱ्या कसोटीमधील तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला होता. मात्र आता अखेर आजच्या संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2024 | 03:21 PM
IND Vs BAN: दुसऱ्या टेस्टमध्ये पावसाचीच 'बॅटिंग'; सामना रद्द झाल्यास भारत WTC फायनल खेळू शकणार का? समीकरण पहाच

IND Vs BAN: दुसऱ्या टेस्टमध्ये पावसाचीच 'बॅटिंग'; सामना रद्द झाल्यास भारत WTC फायनल खेळू शकणार का? समीकरण पहाच

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि बांग्लादेश यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना भारताने मोठ्या दिमाखात जिंकला आहे. तसेच दूसरा सामना देखील सुरू झाला आहे. मात्र या सामन्यात पावसाचा व्यत्यय येत आहे. आजदेखील पावसामुळे दुसऱ्या कसोटीमधील तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबवण्यात आला होता. मात्र आता अखेर आजच्या संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.  दरम्यान या सामन्यात फलंदाजांच्या ऐवजी पावसाने आपली जोरदार बॅटिंग कायम राखली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेट फायनल खेळण्याचे भारताचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दूसरा कसोटी सामना हा कानपुरमध्ये सुरू आहे. दरम्यान या सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. या सामन्यात फक्त एकाच दिवसाचा खेळ झाला आहे. बाकीचे दोन दिवस तर केवळ पावसानेच बॅटिंग केली आहे. दरम्यान कानपुरमध्ये पावसाचा अंदाज असताना देखील बीसीसीआयने या ठिकाणी सामना आयोजित करण्यामागचे कारण काय? अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये पहायला मिळत आहे. जर का हा सामना रद्द झाला तर वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल खेळण्यासाठी भारताचे गणित बिघडू शकते.

UPDATE 🚨

Play for Day 3 in Kanpur has been called off due to wet outfield.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HPPxBMhY87

— BCCI (@BCCI) September 29, 2024

भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आतापर्यंत संघाने १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारत ७ सामने जिंकला आहे. भारताची टक्केवारी ही ७१.६७ टक्के इतकी आहे. बांग्लादेशनंतर भारत मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत परदेशात जाऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. आगामी काळात दोन बलाढ्य संघांशी भारताला दोन हात करावे लागणार आहे. त्यामुळे भरताच मार्ग खडतर आहे. त्यामुळे जर का बांग्लादेशविरुद्ध दूसरा सामना खेळला गेला तर, भारताला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

कानपूरमधील कसोटी सामना जिंकल्यास भारताचे १२ गूण होतील.  मात्र सामना रद्द झाल्यास भारताला केवळ ४ च गूण मिळतील. मात्र यानंतर देखील भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यास पात्र असणार आहे. बाकीचे संघ देखील सर्व सामने जिंकत आलेतर मात्र या पॉईंट्स टेबलमध्ये काहीसा बदल पाहायला मिळू शकतो.आयसीसीच्या माहितीनुसार, भारताला ९ पैकी ६ कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. यामध्ये बांगलादेशविरुद्ध १ आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने भारत मायदेशात खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ५ कसोटी सामने परदेशात खेळावे लागणार आहेत. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जाण्यासाठी भारतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकांवर असणे आवश्यक आहे.

Web Title: Ind vs ban 2 nd test third day cancelled then knwo the team india equation of wtc final 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 03:20 PM

Topics:  

  • IND vs BAN 2nd Test

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.