Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 IND Vs ENG : जेमी स्मिथचे इंग्लंडकडून विक्रमी सर्वात जलद शतक; भारतीय गोलंदाजी निष्प्रभ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथने विक्रमी शतक झळकावले आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा तो पहिलाच इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 04, 2025 | 06:30 PM
IND Vs ENG: Jamie Smith records fastest century for England; Indian bowling ineffective

IND Vs ENG: Jamie Smith records fastest century for England; Indian bowling ineffective

Follow Us
Close
Follow Us:

Jamie Smith’s fastest century for England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील  दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथने भारतीय गोलंदाजीला सळो की पळो करून सोडले आहे. त्याने ८० चेंडूत शतक ठोकून एक खास कामगिरी केली आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा तो पहिलाच इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे. यासह, तो इंग्लंडचा सर्वात जलद कसोटी शतक करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

एजबॅस्टन येथे खेळवल्या जाणाऱ्या  दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडकडून ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला  आलेल्या स्मिथने भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुलवले आहे. त्याने केवळ ८० चेंडूत भारताविरुद्धचे पहिले कसोटी शतक पूर्ण केले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ४७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकार मारून त्याने आपले पहिले शतक साजरे केले.

हेही वाचा : Shubman Gill Photo : इंग्लंडच्या भूमीत इतिहास रचणाऱ्या शुभमन गिलची कमाई माहिती किती आहे का? ‘या’ महागड्या गाड्यांचा आहे चाहता..

टीम इंडियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झकळवण्याचा  विक्रम माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर जमा  आहे. २०१२ मध्ये १३ ते १५ जानेवारी दरम्यान पर्थच्या वाका येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात वॉर्नरने भारताविरुद्ध शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ६९ चेंडूंचा सामना केला होता.

वॉर्नरनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा नंबर येतो. ज्याने डिसेंबर २०१० मध्ये सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ७५ चेंडूंमध्ये १०० धावांची टप्पा पार केला होता. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने जानेवारी २००६ मध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारताविरुद्ध शतक पूर्ण करायला ७८ चेंडू लागले होते.

भारताविरुद्ध कसोटीतील सर्वात जलद शतके

  1. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – ६९ चेंडू, पर्थ (जानेवारी २०१२)
  2. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) – ७५ चेंडू, सेंच्युरियन (डिसेंबर २०१०)
  3. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – ७८ चेंडू, लाहोर (जानेवारी २००६)
  4. जेमी स्मिथ (इंग्लंड) – ८० चेंडू, बर्मिंगहॅम (जुलै २०२५)*
  5. कामरान अकमल (पाकिस्तान) – ८१ चेंडू, लाहोर (जानेवारी २००६)

बर्मिंगहॅम येथे दुसऱ्या कसोटीत  भारताविरुद्ध स्मिथचे ८० चेंडूत १०६ धावा हे इंग्लंडच्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमधील संयुक्त तिसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅककुलमच्या नावावर जमा  आहे. मॅक्युलमने फेब्रुवारी २०१६ मध्ये क्राइस्टचर्च येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फक्त ५४ चेंडूत शतक पूर्ण केले होते.

हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंडच्या कर्णधाराची विकेट अन् डीएसपी सिराजने रचला इतिहास; ‘असे’ करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

Web Title: Ind vs eng jamie smith scores fastest century for england sets a big record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 06:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.