भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिका खेळली जात आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या गिलने ३८७ चेंडूंचा सामना करत २६९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३० चौकार आणि ३ षटकार लगावलेया आहेत. या कामगिरीसह त्याने अनेक विक्रम देखील रचले आहेत. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल कमाईच्या बाबतीत देखील उजवा आहे. सध्या त्याची कमाई गगनाला भिडणारी अशी आहे. मैदानावर धावांचा रतीब घालणारा बड्या बड्या महागड्या गाड्यांचा देखील शौकीन आहे, तसेच पंजाबमधील फिरोजपूरमध्ये त्याचे आलिशान घर देखील आहे. या भारतीय कर्णधाराची नेमकी कमाई किती याबाबत आपण जाणून घेऊया.(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill Photo: What is the income of Shubman Gill, who created history in England? He is a fan of 'these' expensive cars..
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅममध्ये दुसऱ्या कसोटीत शानदार द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. द्विशतक ठोकणारा तो सहावा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या शानदार खेळीच्या मदतीने भारताने इंग्लंडमध्ये चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये धावांचा रातीब घालणारा शुभमन गिल कमाईच्या बाबतीत देखील चांगलाच पुढे आहे. या युवा खेळाडूने अल्पावधीतच चांगली कमाई केली आहे. गिलची सध्याची एकूण संपत्ती सुमारे ३४ कोटी रुपये असून त्याने क्रिकेट व्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीग करार आणि जाहिरातींमधून देखील कमाई केली आहे.
भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल दरमहा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. या व्यतिरिक्त तो वर्षाला ४ ते ७ कोटी रुपयांची कमाई करत असतो. गिलचा बीसीसीआयच्या ग्रेड-ए करारात समावेश असून त्याला वार्षिक ७ कोटी रुपये पगार मिळतो. त्याला सामने खेळण्यासाठी वेगळे पैसे देखील मिळतया असतात.
शुभमन गिलला आयपीएलमधून देखील दर हंगामात १६.५ कोटी रुपये मिळत असतात. इतकेच नाही तर तो अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये देखील दिसून येत असतो. त्यामुळे त्याच्या कमाईमध्ये सतत वाढ होत आहे. जाहिरातींमधून गिल दरवर्षी २ ते ३ कोटी रुपयांची कमाई करत असतो.
कसोटी कर्णधार शुभमन गिलचे पंजाबमधील फिरोजपूर येथे एक आलिशान घर असून त्या घराची किंमत सुमारे ३.२ कोटी रुपये आहे. गिलकडे अनेक आलिशान वाहने आहेत. यामध्ये रेंज रोव्हर वेलार, मर्सिडीज बेंझ ई३५० आणि महिंद्रा थार या वाहनांचा समावेश आहे. महिंद्रा थार त्याला आनंद महिंद्रा यांच्याकडून भेट देण्यात आली आहे. दिली होती.
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा गिल हा ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्यानंतर कसोटीत द्विशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातील तिसरा खेळाडू बनला आहे.