Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : भारतीय संघात होणार मोठी उलथापालथ? एजबॅस्टन कसोटीत कुणाला लागणार लॉटरी, पहा संभाव्य playing XI

एजबॅस्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बूमराह खेळणार नसल्याचे निश्चित मानले जात आहे. जर तो या कसोटीत खेळला नाही तर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 01, 2025 | 09:02 PM
IND Vs ENG: Will there be a big upheaval in the Indian team? Who will be drawn in the Edgbaston Test, see the possible playing XI

IND Vs ENG: Will there be a big upheaval in the Indian team? Who will be drawn in the Edgbaston Test, see the possible playing XI

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात आला होता. सामन्यात भारताला इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात भारताकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत. ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी हे पराभवाचे खरे कारणं आहेत. टीम इंडिया बर्मिंगहॅममध्ये दुसरा सामना खेळणार आहे.  दुसरा सामना २ जुलैपासून  खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याच्या तयारीत आहे. अशातच आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.

अशा परिस्थितीत, बर्मिंगहॅम कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला पुनरागमन करणे खूप आवश्यक असणार आहे. जर आपण या मैदानावरील टीम इंडियाच्या रेकॉर्डबाबत माहिती घेतली तर ती  खूप वाईट राहिली आहे. येथे भारतीय संघाने ८ सामने खेळले आहेत. परंतु यापैकी संघाला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. दुसरीकडे, एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियामध्ये बदल झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा : आता केवळ ‘captain cool’ च नाही, तर ‘या’ खेळाडूंचाही ट्रेडमार्क नोंदणीकृत; पहा संपूर्ण यादी

दुसऱ्या कसोटीत बुमराह खेळणार?

जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत असे विधान समोर आलेले नाही. तरी, एजबॅस्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तो खेळणार नसल्याचे निश्चित मानले जात आहे. जर तो या कसोटीत खेळला नाही तर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्यवस्थापन बुमराहच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही घटकावर देखील आपली भूमिका बजावू शकतो.

जर आपण टॉप ऑर्डरबद्दल सांगायचे झाले तर, येथे कोणताही बदल होणार नसल्याची माहिती मिळत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने शानदार कामगिरी करून दाखवली आहे. लीड्समध्ये भारताच्या चार फलंदाजांनी शतकी खेळी साकारली होती. यामध्ये यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची नावे येतात. त्याच वेळी, साई सुदर्शन आणि करुण नायर यांना आणखी एक संधी देण्यात येऊ शकते.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘जसप्रीत बुमराह उपलब्ध, पण..’, दुसऱ्या कसोटीत ‘यॉर्कर किंग’ च्या खेळण्याबाबत कर्णधार Shubhman Gill चे मोठे वक्तव्य..

अशी असेल एजबॅस्टन येथे टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज.

Web Title: Ind vs eng who will be drawn in the edgbaston test see the probable playing xi of the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 09:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.