फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची T२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. यामध्ये पाच सामान्यांची T२० मालिका होणार आहे तर तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध ही एकमेक मालिका असणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून बॉर्डर-गावसकर मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माच्या सेनेला आता पुन्हा विजयी मार्गावर यायचे आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. या मालिकेत डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे पुनरागमन निश्चित आहे.
अर्शदीप हा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतीय गोलंदाजीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे त्याने गेल्या वर्षीही जोरदार कामगिरी केली होती. त्याला इंग्लिश संघाविरुद्ध मोठा विक्रम करण्याची संधी आहे. अर्शदीप सध्या T२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे, त्याच्या नावावर ९५ विकेट आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने पाच विकेट्स घेतल्यास या फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरेल. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय बनण्यासाठी आणि युझवेंद्र चहलला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी दोन विकेट्सची गरज आहे.
Delightful bowling 👌👌
Arshdeep Singh bowled an excellent first spell and picked up 2⃣ early wickets 🔥#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/eTrCnJbd5H pic.twitter.com/OSPU87Agtb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 11, 2025
अर्शदीपने गेल्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३५ बळी घेऊन भारतासाठी सर्वाधिक बळी घेतले होते. २०२४ च्या T२० विश्वचषकात तो संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आणि त्यानंतर त्याने १७ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीनेही स्पर्धेत शानदार गोलंदाजी करत १७ बळी घेतले.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या संघात ज्या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला जाईल ते जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज आहेत. या तिघांपैकी केवळ दोन खेळाडूच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकेल, तर हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावेल. रिपोर्टनुसार, मोहम्मद शमीचा संघात समावेश त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. इंग्लडविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये जर मोहम्मद शामी संघाचा भाग असेल तर त्याच्या कामगिरीवर त्याला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये स्थान मिळू शकते.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिका झाल्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीचा भारतीय संघाचा पहिला सामना बांग्लादेशविरुद्ध आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचे आयोजन २० फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. टीम इंडियाचे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तीन सामने होणार आहेत. यामध्ये पहिला बांग्लादेश तर दुसरा पाकिस्थानविरुद्ध आणि शेवटचा तिसरा साखळी सामना न्यूझीलंडविरुद्व खेळवला जाणार आहे.