
IND vs NED, T20 World Cup: Surya Army will score a mountain of runs at Narendra Modi Stadium! India won the TOSS and decided to bat
IND vs NED, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ व्या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स यांच्यात लढत होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नेदरलँड्स संघ गोलंदाजी करणार आहे.या (टी-२० विश्वचषक २०२६ )स्पर्धेत भारताला अभिषेक शर्माच्या फॉर्मबाबत चिंता आहे. कारण दोन डावांमध्ये खाते उघडण्यात अपयशी ठरलेला सलामीवीर अभिषेक शर्माला नेदरलँडविरुद्ध होणाऱ्या टी-२० विश्वचषक सामन्यात मोठी मोठी खेळी करावी लागणार आहे. भारतीय संघ सुपर ८ मध्ये आपले स्थान आधी पक्के करून बसला आहे. आजचा सामना भारतीय संघासाठी २६ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी एक रंगीत तालिम असणार आहे.नेदरलँड्स संघ आधीच या स्पर्धेतील आशा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे हा संघ कोणत्याही भीतीविना भारताविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा : IND vs NED, T20 World Cup : अहमदाबादमध्ये कोण गाजवणार मैदान? फलंदाज की गोलंदाज? वाचा सामन्याचा पिच रिपोर्ट
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. मैदान चांगले दिसतेय, काल रात्री आपण येथे सराव केला होता, थोडे दव पडले होते, त्यामुळे आशा आहे की आपण बोर्डवर धावा मिळवू आणि त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करू कारण आपण २-३ दिवसांनी अशाच स्ट्रिपवर खेळणार आहोत, मग गोलंदाजांवर थोडे दबाव का आणू नये.आमच्याकडे दोन बदल करण्यात आले आहेत. कुलदीपच्या जागी अर्शदीप संघात येत आहे तर अक्षर विश्रांती घेत असून वॉशिंग्टन संघात परतत आहे.”
नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स टॉस गमावल्यावर म्हणाला की, “आम्ही फलंदाजी केली असती. तसेच खूप चांगल्या विकेट दिसत आहेत.” जेव्हा त्याला या सामन्यातून तुम्ही काय शोधत आहात? हा प्रश्न विचराला तेव्हा पाहुणा कर्णधार म्हटलं की, “हो, भारतात खेळणे हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो. आम्हाला असे वाटते की आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलो आहोत. तसेच आमच्याकडे एक बदल करण्यात आला आहे तो म्हणजे फ्रेड क्लासेनऐवजी नोआ क्रोस संघात आला आहे.”
नेदरलँड्स प्लेइंग इलेव्हन : मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अॅकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), झॅक लायन-कॅचेट, नोआह क्रोस, रोएलॉफ व्हॅन डेर मेरवे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन
भारत प्लेइंग इलेव्हन : इशान किशन (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह