
IND vs NED, T20 World Cup: Who will dominate the field in Ahmedabad? Batsmen or bowlers? Read the match pitch report
Pitch report for India vs Netherlands match : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील ३६ वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. हा सामना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. भारतीय संघाने पूर्वीच पाकिस्तानला पराभूत करत सुपर ८ टप्प्यासाठी पात्रता मिळवली आहे. या सामन्यातही भारतीय संघ आपली लय कायम राखण्यासाठी उत्सुक असणार आहे. हा सामान्यासाठी पिच आहवाळ काय आहे त्याबाबत आपण माहिती घेऊया.
हेही वाचा : RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, गतविजेत्या भारताने सलग तीन गट-टप्प्यात विजय मिळवत सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवला आहे. ज्यात पाकिस्तानविरुद्ध ६१ धावांनी मोठा विजय देखील सामील आहे. भारत गट-अ मध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे.
नेदरलँड्स गट-टप्प्यात चौथ्या स्थानावर असून या संघाला सुपर ८ मध्ये पात्र होण्यासाठी त्यांना चमत्काराची आवश्यकता असणार आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर, डच संघ आता अहमदाबादच्या प्रेक्षकांविरुद्ध आणि भारताविरुद्ध शानदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करून स्पर्धेत त्यांचा आत्मविश्वास दाखवण्याचा नेदरलँड्स संघाचा उद्देश असणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी ही सामान्यतः संतुलित असते, परंतु टी-२० सामन्यांमध्ये ती फलंदाजांना अनुकूल असल्याचे आजवर दिसून आले आहे. खेळपट्टी सपाट असते आणि विश्वासार्ह उसळी देणारी आहे. ज्यामुळे खेळाडूंना स्ट्रोक खेळणे अधिक सोपे होऊन जाते. वेगवान गोलंदाज सुरुवातीला नवीन चेंडूसह हालचाल आणि कॅरी करू शकतात, तर मधल्या षटकांमध्ये पृष्ठभाग मंदावल्याने फिरकीपटू प्रभावी ठरण्याची अधिक शक्यता असते.
मॅचच्या दिवशी अहमदाबादमधील हवामान स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित असण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. पावसाची शक्यता नसून ज्यामुळे सामना(आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६)सुरळीत पार पडण्याची शक्यता आधिक आहे. सामन्याच्या वेळी तापमान सुमारे २२°C, आर्द्रता २१% आणि वाऱ्याचा वेग ११.६ किमी/तास असेल. क्रिकेट खेळण्यासाठी ही परिस्थिती आदर्श मानली जाते.
हेही वाचा : अरेरे पाकवर काय ही वेळ! ‘आम्ही भांडीही धुतली…’ कर्णधाराने हॉटेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची कहाणी उलगडली
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
नेदरलँड्: स्कॉट एडवर्ड (कर्णधार), कॉलिन अकरमन, नोहा कुस, बास डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, मायकेल लेविट, ॉक लिऑन-कॅशेट, मॅक्स ओ डॉड, लोगान व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगटेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार.