Sourav Ganguly : कुलदीप अथवा मानव कुठे आहेत? वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर गांगुलींनी उपस्थित केला प्रश्न

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित केला. कुलदीप यादव आणि मानव सुथार कुठे आहेत, असा सवाल करत त्यांनी संघात विशेषज्ञ फिरकीपटू असण्याची गरज अधोरेखित केली.
Sourav Ganguly : कुलदीप अथवा मानव कुठे आहेत? वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर गांगुलींनी उपस्थित केला प्रश्न
Sourav Ganguly : कुलदीप अथवा मानव कुठे आहेत? वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर गांगुलींनी उपस्थित केला प्रश्न Sourav Ganguly : कुलदीप अथवा मानव कुठे आहेत? वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्यानंतर गांगुलींनी उपस्थित केला प्रश्न (फोटो सौजन्य : एआयएएनएस)
Published on: 
Updated on: 
  • गागुंलींकडून कौतुक आणि टोमणाही

  • संघात फिरकीपटू नसल्यानं गांगुलींना प्रश्न

  • कुलदीप स्थानिक क्रिकेटसाठी रिलीज

Sourav Ganguly : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आलेल्या टेस्ट मालिकेचा पहिला सामना ड्रॉ राहिला, ज्यानंतर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बेसिन रिझर्व्हवरील सपाट खेळपट्टीवर भारताने पहिला डाव 720/9 वर घोषित केला. या काळात के. एल. राहुल आणि ऋषभ पंतने शतक झळकावले. टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 352 धावांची आघाडी मिळवली होती.

दरम्यान, न्यूझीलंड सामना ड्रॉ करण्यास यशस्वी राहिला. डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्सने खेळपट्टीवर टिकून खेळत आपल्या संघाला 120 षटकांत 239/5 पर्यंत पोहचवले, ज्यानंतर दोन्ही संघांनी सामना ड्रॉ करण्याबाबत सहमती दर्शवली.

संघात फिरकीपटू नसल्यानं गांगुलींना प्रश्न

गांगुली यांनी मागील व्हाइट बॉल मालिकेत भारतीय संघाची कामगिरी आणि वेलिंग्टन कसोटीमधील फलंदाजांच्या खेळाचे कौतुक केले, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही विशेषज्ज्ञ फिरकीपटू नसल्याने त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

सौरव गांगुली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले की, या सीरीजमध्ये भारताची कामगिरी शानदार राहिली, मग व्हाईट बॉल असो वा रेड बॉल. फलंदाजांचा खेळ खूपच छान राहिला. पण त्यांना हे समजावे लागेल की, परदेशात कसोटी सामना जिंकण्यासाठी अशा खेळपट्टीवर संघात एक चांगला फिरकीपटू असणे नितांत गरजेचे असते, कारण या खेळपट्ट्या कालांतराने आणखीन सपाट होत जातात.

टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्याला एका फिरकीपटूला खेळवाव लागेलच. वॉशिंग्टन सुंदर एक अष्टपैलूच्या रुपात खेळू शकतो, पण बीसीसीआय कुलदीप अथवा मानव सुथार कुठे आहे?

कुलदीप स्थानिक क्रिकेटसाठी रिलीज

वेलिंग्टन सामन्याआधी भारताने कुलदीप यादवला आपल्या टेस्ट संघातून रिलीज केले होते. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज गुरनूर बरारला संघात समाविष्ट करण्यात आले. कुलदीप न्यूझीलंडविरुद्ध चौथा वनडे सामना खेळला, ज्यानंतर त्याला स्थानिक क्रिकेटसाठी रिलीज करण्यात आले.

रविवारी त्याला सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत झारखंडविरुद्ध उत्तर प्रदेशच्या वतीने खेळताना पाहण्यास मिळालेले. दुसरीकडे, मानव सुथारला न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आले नाही आणि तो सध्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये राजस्थानसाठी खेळत आहे.

भारताकडे रवींद्र जडेजाला खेळवण्याचा पर्याय होता, पण वेलिंग्टन कसोटीसाठी त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला निवडण्यात आले. दरम्यान, या ऑफ स्पिनरने दुसऱ्या डावात डेवॉन कॉन्वेला आउट केले, पण खेळपट्टी खूप सपाट होते, ज्यामुळे ना तर भारतीय गोलंदाजांना मदत मिळाली नाही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना.

सुंदरला निवडण्याच्या निर्णायावर बोलताना भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक म्हणाले की, न्यूझीलंडच्या संघात अनेक डावखुरे फलंदाज आहेत, ज्यामुळे एका ऑफ स्पिनरची गरज होती.