कर्णधार शुभमन गिल (फोटो- ट्विटर)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना ड्रॉ राहिला आहे. या टेस्टमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक, सकारात्मक खेळ केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग देखील चांगली झाली. पहिल्या कसोटीतील खेळपट्टीने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही वेगवेगळ्या टप्प्यांवर साथ दिल्याचे पहायला मिळाले. शुभमन गिलने यावर या प्रतिक्रिया दिली आहे.
सामना झाल्यावर कर्णधार शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे. मैदानावरील सर्व दिवस आव्हनात्मक होते असे म्हणता येणार नाही. या पीचवर विरोधी संघाचे १० खेळाडू आउट करणे हे अत्यंत अवघड असणार आहे याचा आमहाल आधीच थोडासा अंदाज होता असे कर्णधार गिलने म्हटले आहे. भारतीय संघाकडे सामना जिंकण्याची संधी निश्चितच जास्त होती. मात्र निकाल काय लागेल हे ठामपणे सांगा येणार नाही. शेवटचा दिवस फिल्डिंगच्या दृष्टीने आमच्यासाठी खास होता.
भारत आणि न्यूझीलंडचा पहिला सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे भारताकडे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुढे जाण्यासाठी कोणते पर्याय आहे ते जाणून घेऊयात. सध्या भारताच्या खात्यात ५० टक्के पॉईंट्स आहेत. मात्र पुढील ६ सामन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणे भारतासाठी थोडेसे अवघड असणार आहे.
सध्याच्या WTC साठी भारताला आणखी ६ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील ५ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे भर्तासमोरील आव्हान सोपे नसणार आहे. सर्व ६ सामने भारताने जिंकल्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची शक्यता वाढणार आहे.
Ans: पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताच्या खात्यात ५० टक्के गुण आहेत. त्यामुळे उर्वरित सहा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
Ans: शुभमन गिलच्या मते, या खेळपट्टीवर विरोधी संघाचे सर्व १० फलंदाज बाद करणे अत्यंत कठीण होते.






