Amol muzumdar on Ind vs pak no handshake policy
थायलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी भारत-पाकिस्तान सामन्यातील नो हँडशेक वादावर प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान झालेल्या हँडशेकबद्दल विचारले असता, मजूमदार यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, घाचे लक्ष सध्या पहिल्या सामन्यावर आहे आणि खेळाडू मैदानाबाहेरील बाबींकडे लक्ष देत नाहीत.
ते म्हणाले की, ‘आम्ही मैदानाबाहेरील बाबींवर लक्ष केंद्रित करत नाही. पाकिस्तानविरुद्ध सामना खेळताना आम्ही त्याबद्दल बोलू. सध्या आमचे लक्ष उद्याच्या सामन्यावर केंद्रित आहे. आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.
जून २०२६ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या भारत-पाकिस्तान महिला टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक केले नाही. त्यापूर्वी, ऑक्टोबर २०२५ मध्ये कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान भारतीय महिला संघाने याच धोरणाचे पालन केले होते. परंतु, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यात भारतीय खेळाडू हँडशेक करतील का, असे जेव्हा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला विचारण्यात आले, तेव्हा तिने स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यामुळे, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघांतील खेळाडू हँडशेक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
टीम इंडियाने क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक न करण्याचे धोरण सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या पुरुष आशिया कप स्पर्धेदरम्यान सुरू झाले. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्या आशिया कप स्पर्धेदरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये हँडशेक करणे टाळले होते. तेव्हापासून, भारतीय खेळाडूंनी विविध वरिष्ठ, महिला आणि वयोगट स्पर्धांमध्ये हे धोरण कायम ठेवले आहे.






