शुभमन गिलने पकडला शानदार कॅच (फोटो- ट्विटर)
दुसऱ्या डावात श्रीलंकेचा संघ चांगली फलंदाजी करू शकला नाहीये. श्रीलंकेने 229 रन्सवर 6 विकेट्स गमावल्या आहेत. श्रीलंकेने 16 रन्सची अगदी घेतली आहे. उद्याच्या दिवसात श्रीलंका किती रन्सचे टार्गेट भारतीय संघाला देते हे पाहणे आवश्यक असणार आहे. त्यातच सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने एक कॅच अत्यंत चपळाईने पकडला आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलच्या एका अप्रतिम कॅचने सर्वांनाच अचंबित केले आहे. श्रीलंकेचा संघ फॉलोऑन मध्ये फलंदाजी करत असताना दोन फलंदाजांनी 115 रन्सची पार्टनरशिप केली होती. त्यातच शुभमन गिलने शानदार कॅच पकडत ही पार्टनरशिप मोडली.
प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर कामिंदू मेंडिसने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटवर नीट आला नाही. त्यामुळे बॉल हवेत उंच गेला मात्र त्याला वेग आणि योग्य दिशा प्राप्त झाली नव्हती. यावेळेस कर्णधार शुभमन गिलने मागे पळत जाऊन एक शानदार अप्रतिम कॅच पकडला. हवेत सूर मारून शुभमन गिलने अप्रतिम कॅच पकडला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
If leading from the front had to be captured in one moment! 👊 Prasidh Krishna nails the short ball, and Shubman Gill pulls off a stunning catch to dismiss Kamindu Mendis! 🫴💥 Watch #SLvIND, 2nd Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.… pic.twitter.com/qeNzO8uqww — Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 26, 2026
Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान
कर्णधार शुभमन गिलने कॅच पकडत पार्टनरशिप मोडली. यामुळे कामिंदू मेंडिस ५२ रन्स करून आउट झाला. शुभमन गिलने पकडलेला हा कॅच पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. सध्या शुभमन गिलच्या या अप्रतिम कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना देखील जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.






