IND vs Tha Asia Cup Match
थायलंडची नन्नपत कोन्चारोएनकाई सध्या दुकापतग्रस्त आहे. तिच्या जागी थिपाचा पुत्थावोंगला थायलंडचा स्टॅंड इन कर्णधार बनवण्यात आले आहे. थिपाचाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थिपाचा पुट्टावाँगच्या मते, त्यांना भारताला १२०-१३० धावांवर रोखावे लागेल.
नाणेफेक गमावल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचाही विचार केला होता, पण प्रथम फलंदाजी करण्यातही काही अडचण नाही. जेमी संघात नसल्यामुळे प्रतिका आज पदार्पण करत आहे. आम्हाला चांगला क्रिकेट खेळायचा आहे. आम्ही आक्रमकपणे खेळण्याबद्दल बोललो आहोत आणि ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.’
थायलंडविरुद्धच्या सामन्यात प्रतीका रावलने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. नाणेफेकीपूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हस्ते प्रतीकाला कॅप देण्यात आली. प्रतीकाच्या निवडीबद्दल सतत चर्चा सुरू होती, पण अखेरीस आज तिने भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. दुखापतग्रस्त जेमिमाच्या जागी प्रतिका रावलला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
कागदावर भारतीय संघ वरचढ दिसत असला तरी, या फॉरमॅटमध्ये कोणताही संघ कधीही कोणत्याही संघाला हरवू शकतो. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये भारताचा सर्विव सामने जिंकले आहेत. भारताने २०१८ आणि २०२२ च्या सामन्यांमध्ये थायलंडला पराभूत केले होते.
भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांति गौड, नंदिनी शर्मा
थायलंड: नन्नापत कोन्चारोएनकाई, नत्थाकन चन्थम, नरुएमोल चायवाई, फन्निता माया, चनिडा सुत्थिरुआंग, सुत्थिरुआंग लाओमी, ओन्निचा कामचोम्फू, थिपाचा पुथावोंग, सुनिदा चतुरोंगरत्तना, अपिसरा सुवान्चोनराथेच यानिसा फेंगपैन.
श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?






