Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs WI : जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा जॉन कॅम्पबेलने शतक ठोकले आहे. या शतकासह वेस्ट इंडिजचे फलंदाज विवियन रिचर्ड्स आणि भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या यादीत सामील झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 13, 2025 | 02:34 PM
Ind vs WI: John Campbell wins Delhi! Joins the list of legendary duos of Vivian Richards and Kapil Dev...

Ind vs WI: John Campbell wins Delhi! Joins the list of legendary duos of Vivian Richards and Kapil Dev...

Follow Us
Close
Follow Us:

John Campbell joins special list : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियवर खेळला जात आहे. या समान्यत  जॉन कॅम्पबेलने १९९ चेंडूत ११५ धावा केल्या आहेत. कॅम्पबेलचे हे पहिले कसोटी शतक असून त्याने  रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले.

दुसऱ्या कसोटीतील सामन्यातील शतकासह, कॅम्पबेलने एलिट यादीत प्रवेश मिळवला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आपले पहिले कसोटी शतक करणारा तो १७ वा खेळाडू ठरला आहे. हे तेच स्टेडियम आहे जिथे वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स आणि भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी शतके थोकण्याची किमया साधली होती. कॅम्पबेल आता या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे.

हेही वाचा : IND vs WI : ‘तुम्हाला माहिती आहे तर तो… ‘, जेव्हा जसप्रीत बुमराहने हसून पंचांना अपील केली, पहा Video

क्रिकबझच्या मते, जॉन कॅम्पबेल दिल्लीत आपले पहिले कसोटी शतक झळकावणारा १७ वा खेळाडू ठरला आहे. यामध्ये  उल्लेखनीय म्हणजे, या १७ खेळाडूंपैकी सहा खेळाडू हे वेस्ट इंडिजचे आहेत. भारतातील इतर कोणत्याही मैदानाच्या तुलनेत दिल्ली हे असे मैदान आहे जिथे सर्वाधिक खेळाडूंनी त्यांचे पहिले कसोटी शतक ठोकली आहेत. कॅम्पबेलपूर्वी, दिल्लीमध्ये शेवटचे शतक ठोकणारे  फलंदाज नयन मोंगिया आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५२ धावा काढल्या होत्या.

वेस्ट इंडिजचा जॉन कॅम्पबेलने त्याच्या ४८ व्या डावात पहिले कसोटी शतक झळकावून एक खास कामगिरी केली आहे.  कसोटी इतिहासामध्ये  सलामीवीराने पहिले कसोटी शतक गाठण्यासाठी घेतलेले हे दुसरे सर्वाधिक डाव ठरले आहेत. कॅम्पबेल दक्षिण आफ्रिकेच्या ट्रेवर गोडार्डच्या विश्वविक्रमापासून जास्त दूर नाही, ज्याने त्याच्या ५८ व्या डावात पहिले कसोटी शतक झळकावले होते.

हेही वाचा : IND vs WI : भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलने ठोकले शतक! जागतिक विक्रम मोडण्यापासून राहिला थोडक्यात, वाचा सेशनचा अहवाल

 १९ वर्षांनंतर घडले असे काही…

जॉन कॅम्पबेलने शतक झळकावून एक मोठा टप्पा पार केला आहे.भारतात  तो १९ वर्षांत सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. २०२३ नंतर कसोटीत शतक झळकावणारा पहिला सलामीवीर देखील ठरला आहे. कॅम्पबेलपूर्वी, डॅरेन गंगाने भारताविरुद्ध सलामीवीर म्हणून वेस्ट इंडिजसाठी शतक लगावले होते. २२ ते २६ जून २००६ दरम्यान खेळवण्यात आलेल्या बासेटेरे कसोटीच्या पहिल्या डावात गंगाने ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील संघासाठी २९४ चेंडूत १३५ धावा फटकावल्या होत्या.

Web Title: Ind vs wi john campbell joins the list of legendary duos of vivian richards and kapil dev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Ind vs WI

संबंधित बातम्या

IND vs WI : फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारताने कधी केली होती फलंदाजी? रवींद्र जडेजाचे देखील पदार्पण झाले नव्हते
1

IND vs WI : फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारताने कधी केली होती फलंदाजी? रवींद्र जडेजाचे देखील पदार्पण झाले नव्हते

IND vs WI : ‘तुम्हाला माहिती आहे तर तो… ‘, जेव्हा जसप्रीत बुमराहने हसून पंचांना अपील केली, पहा Video
2

IND vs WI : ‘तुम्हाला माहिती आहे तर तो… ‘, जेव्हा जसप्रीत बुमराहने हसून पंचांना अपील केली, पहा Video

IND vs WI : भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलने ठोकले शतक! जागतिक विक्रम मोडण्यापासून राहिला थोडक्यात, वाचा सेशनचा अहवाल
3

IND vs WI : भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलने ठोकले शतक! जागतिक विक्रम मोडण्यापासून राहिला थोडक्यात, वाचा सेशनचा अहवाल

IND vs WI 2nd Test Day 3 Stumps: दिल्ली कसोटीचा तिसरा दिवस संपला! वेस्ट इंडीजची जोरदार झुंज; शेवटच्या सत्रात भारताला निराशा
4

IND vs WI 2nd Test Day 3 Stumps: दिल्ली कसोटीचा तिसरा दिवस संपला! वेस्ट इंडीजची जोरदार झुंज; शेवटच्या सत्रात भारताला निराशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.