IND vs WI: John Campbell's great feat against India! He did 'this' in Test cricket
IND vs WI 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबाद येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव खूपच गदगडला. भारतीय गोलंदाजीसमोर हा संघ १६२ धावाच करू शकला. पण असे असून देखील त्यांच्या एका खेळाडूने मात्र एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. वेस्ट इंडिजच्या सलामीवीर जॉन कॅम्पबेलने भारताविरुद्ध मोठी कामगिरी केली आहे. कॅम्पबेलने भारताविरुद्धच्या कसोटीत तेजनारायण चंद्रपॉलसोबत डावाची सुरुवात केली होती. परंतु, तेंच्यात भागीदारी होऊ शकली नाही, परंतु फलंदाज म्हणून, कॅम्पबेलने एक महत्त्वाची कामगिरी पार पडली. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा ६१ वा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा : USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये, वेस्ट इंडिजची सलामी जोडी १२ धावाच जोडू शकली. जॉन कॅम्पबेलने या १२ धावांपैकी ८ धावा काढल्या आणि उर्वरित ४ धावा लेग बायमधून आल्या. याचा अर्थ तेजनारायण चंद्रपॉल एकही धाव न काढताच बाद झाला. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ८ धावा काढणाऱ्या जॉन कॅम्पबेलने अशी कोणती कामगिरी केली?
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जॉन कॅम्पबेलची कामगिरी म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये १,००० धावा पूर्ण केल्या आहेत. जॉन कॅम्पबेलला अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात फक्त ८ धावाच करता आल्या. तरी त्या कसोटी क्रिकेटमध्ये १,००० धावा पूर्ण करण्यासाठी पुरेशा ठरल्या.
अहमदाबाद येथील भारताविरुद्धच्या कसोटीपूर्वी, जॉन कॅम्पबेलला कसोटी क्रिकेटमध्ये १,००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ६ धावांची गरज होती. यापूर्वी, त्याने २३ कसोटी सामन्यांमध्ये ४६ डावांमध्ये ९९६ धावा फटकावल्या होत्या. तथापि, २४ व्या कसोटी सामन्याच्या ४७ व्या डावात, त्याने १००० कसोटी धावांचा टप्पा पार केला आणि तो असा विंडीजचा ६१ वा फलंदाज बनला. जॉन कॅम्पबेलच्या आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १,००२ धावा केल्या आहेत. त्याने ४७ डावांमध्ये ३ अर्धशतकांसह ही कामगिरी केली आहे.