यूएसए क्रिकेट संघ(फोटो-सोशल मीडिया)
USA Cricket : मागील महिम्यात आयसीसी सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आल्यानंतर यूएसए क्रिकेटकडून आता एक आश्चर्यकारक पाऊल उचलण्यात आले. सदस्य देश म्हणून त्याच्या जबाबदाऱ्यांचे वारंवार उल्लंघन करण्यात आल्यामुळे आयसीसीकडून यूएसए क्रिकेटला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. निलंबनानंतर, यूएसए क्रिकेटकडून आता प्रकरण ११ दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसशी झालेल्या वादाच्या सुनावणीपूर्वी यूएसए क्रिकेटने आता मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच आयसीसी सदस्य संस्थेने प्रकरण ११ अंतर्गत दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा : नामिबियाची मोठी झेप! टी-२० विश्वचषकासाठी मिळवली पात्र; जागतिक व्यासपीठावर दमदार कामगिरीस सज्ज
प्रकरण ११ दिवाळखोरी नेमका काय प्रकार आहे?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, प्रकरण ११ दिवाळखोरी म्हणजे काय? ते व्यवसाय किंवा व्यक्तीला न्यायालयीन देखरेखीखाली त्यांचे वित्त आणि कर्ज पुनर्गठित करण्यासाठीची परवानगी देत असते. असे करतम असताना, बोर्ड त्याचे कामकाज सुरू ठेवू शकते. प्रकरण ७ च्या उलट, ज्यामध्ये मालमत्तेचे लिक्विडेशनचा समावेश आहे. प्रकरण ११ ही एक पुनर्रचना दिवाळखोरी असून जी संघर्ष करणाऱ्या उद्योगाला नवीन सुरुवात देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेससोबत झालेल्या वादाच्या सुनावणीपूर्वी पार पडलेल्या बैठकांमध्ये, यूएसए क्रिकेटच्या वकिलाकडून दिवाळखोरीची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसने याबाबत बोलताना म्हटले आहे की यूएसए क्रिकेटकडून सुनावणी सुरू होण्याची वाट देखील पाहण्यात आली नाही आणि दिवाळखोरी घोषित करण्यात आली कारण त्यांना निकाल आधीच माहित होता. त्यांच्याकडून आरोप करण्यात आला की, यूएसएसीला क्रिकेटची किंवा त्यांच्या खेळाडूंच्या हिताची काळजी नसून राजकारणाचे वेड लागले आहे आणि ते फक्त त्यांच्या संचालकांच्या वैयक्तिक अजेंड्यांची काळजी घेत असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा : IND vs WI 1st Test : ‘यॉर्कर किंग’ धुमाकूळ! बूमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर कॅरिबियन फलंदाजांची दाणादाण; पहा Video
१ ऑक्टोबर रोजी यूएसए क्रिकेटच्या अध्याय ११ दिवाळखोरीच्या अर्जामुळे अलीकडेच यूएसएसीशी करार केलेल्या किंवा अलीकडेच मोठ्या आणि किरकोळ क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यूएसए क्रिकेट २०२६ च्या टी२० विश्वचषकात देखील सहभाग होणार आहे. तथापि, अध्याय ११ दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यानंतर, आता यूएसए संघ सहभागी होण्याची शक्यता आहे की नाही? हे पाहणे रंजक असणार आहे.