India A tour of Nepal: रायझिंग स्टार्समधून बाहेर, आता Team India निघणार नेपाळ दौऱ्यावर! कधी अन् कुठे भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

India A tour of Nepal 2026 Schedule: भारत 'अ' संघ डिसेंबरमध्ये नेपाळविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. यासाठी संघ अद्याप जाहीर झालेला नाही, परंतु वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश होण्याची शक्यता आहे.
India A tour of Nepal 2026 Schedule
India A tour of Nepal 2026 SchedulePhoto- social Media
Published on: 
Updated on: 
  • नेपाळमध्ये टीम इंडिया घालणार धुमाकूळ

  • तीन टी-२० सामन्यांसाठी भारत A चा दौरा निश्चित

  • पाहा संपूर्ण शेड्यूल

India A tour of Nepal: भारत अ संघाचा रायझिंग स्टार्स आशिया कपमधील प्रवास संपुष्टात आला आहे. भारत अ आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा धुव्वा उडवला. या पराभवामुळे टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

दरम्यान, भारतीय अ संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी नेपाळला जाणार आहे. ही आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग असणार नाही. परंतु, हे सामने रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील मालिक कधीपासून खेळली जाणार, वेळापत्रक जाणून घेऊयात.

भारत 'अ' संघ आणि नेपाळ यांच्यातील टी-२० मालिका कधी?

भारताचा 'अ' संघ नेपाळविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. मालिकेतीस पहिला सामना ९ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. तर, दुसरा सामना ११ डिसेंबर रोजी आणि तिसरा सामना १३ डिसेंबर रोजी खेळला जाईल. हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:४५ वाजता सुरू होतील. म्हणजेच हे सामने दिवसा खेळले जातील. या मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तिलक वर्मा कर्णधार म्हणून कायम राहणर की नवीन कर्णधाराची नियुक्ती केली जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

India A tour of Nepal 2026 Schedule
IND vs NZ: एका खेळीत विक्रमांची रांगच पार! केन विल्यमसनला पछाडलं, कोहलीलाही टाकलं मागे; Tom Lathamची WTC मध्ये ऐतिहासिक कामगिरी

वैभव सूर्यवंशीलाही मिळू शकते संधी

आशिया कप रायझिंग स्टार्स सामन्यात युएईविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला या मालिकेत देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. नेपाळविरुद्धच्या एकदिवसीय सामनय्ता वैभवने ५२ चेंडूमध्ये २०४ धावांची वादळी खेळी करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे नेपाळविरुद्ध संधी मिळाल्यास वैभवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मालिका आता जवळ आल्याने संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

डिसेंबरपासून श्रीलंकेविरुद्ध ODI-T20 मालिका

भारताचा वरिष्ठ संघ डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. १३ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होईल. तिसरा आणि अंतिम सामना १९ डिसेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर तीन टी-२० सामनेही होतील.

India A tour of Nepal 2026 Schedule
IND vs NZ: मैदानात उतरताच यशस्वी जैस्वालने केला 'हा' अनोखा विश्वविक्रम! सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे