Bangladesh Cricket News: टी-२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी भारत-बांगलादेशमध्ये मोठा वाद! मुस्तफिजुर रहमान प्रकरणावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात येण्यास नकार दिला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद सिराज देखील या मालिकेत खेळताना दिसणार आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला नव्हता.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २७ आणि २९ डिसेंबर रोजी होणार होते आणि त्यातून मिळणारी रक्कम बाधित लोकांना मदत करण्यासाठी वापरली जाणार होती. तथापि, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
IND vs BAN: बांगलादेशने या वर्षासाठी त्यांचे होम कॅलेंडर देखील जारी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या दौऱ्यावर असेल, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची…
इंग्लंडच्या निकोलस ली या अनुभवी खेळाडूकडे भारतीय महिला संघाच्या नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयकडून 2026 चा सेंट्रल करार जाहीर करण्याची शक्यता आहे. या करारामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताकडून शेवटचा खेळला होता. शमीला पुन्हा विचारात घेण्यापूर्वी स्थानिक क्रिकेटमधून लय मिळवावी लागेल असे सांगितले.
बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले. रहमानला २०२६ च्या आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
गौतम गंभीरने मायदेशात ५ कसोटी सामने गमावले आहेत आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याचा सर्वात वाईट विक्रम आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आता गंभीरच्या भविष्याबद्दल मौन सोडले आहे.
पुढील वर्षी झिम्बाब्वेमध्ये येथे आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय ज्युनियर संघ जाहीर करण्यात आला आहे. १५ सदस्यीय संघाचे आयुष म्हात्रे नेतृत्व करणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, गौतम गंभीरच्या रेड-बॉल प्रशिक्षकपदाच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहे. अशातच आता त्याच्या जागी दूसरा कसोटी प्रशिक्षक नेमण्यात येण्याचे बोलले जात आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट दिल्लीकडून आणि रोहित मुंबईकडून खेळत आहे. दोघेही बीसीसीआयचे करारबद्ध खेळाडू आहेत, परंतु विजय हजारे ट्रॉफीमधून त्यांना भरपूर कमाई देखील होते.
Ravindra Jadeja: विजय हजारे ट्रॉफीमध्ये आता रवींद्र जडेजाची एन्ट्री झाली आहे. सौराष्ट्रकडून खेळताना जडेजा आपला जुना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित-विराटनंतर जडेजाच्या पुनरागमनामुळे स्पर्धेचा रोमांच वाढला आहे.
अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या १९१ धावांच्या पराभवानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने मौन सोडले आहे. गोलंदाजीतील त्रुटी आणि खराब क्षेत्ररक्षण हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे त्याने सांगितले.
बीसीसीआय आयोजित २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या १७ सदस्यीय संघाच्या कर्णधारपदी हर्ष दुबेची निवड करण्यात आली आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात बदल करायचे असतील तर भारताला ७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता त्यावरून राजकारण तापले आहे. याविषयी संसदेतील परिसरात शशी थरुर आणि रंजीव शुक्ला यांच्यात चर्चा…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी लखनौ येथे चौथा टी२० सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे चाहते निराश झाले. आता या प्रकरणावर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.
परदेशी खेळाडू लिलावात सहभागी होतात परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेतात. गेल्या काही वर्षांत असे अनेक वेळा घडले आहे आणि यामुळे बीसीसीआयने एक नियम लागू केला आहे.
आज, मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे ३६९ खेळाडूंचे भवितव्य निश्चित होणार आहे. लिलावापूर्वी, मल्लिका सागरबद्दल जाणून घ्या, ज्याच्या हातून या खेळाडूंचे भवितव्य ठरेल.