IND vs PAK: India-Pakistan will come face to face again; Read when will the big clash happen?
India Women vs Pakistan Women : आशिया कप २०२५ स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला रंगणार आहे. यावेळी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. महिला विश्वचषक आजपासून (३० सप्टेंबर) सुरू होणार आहे. महिला विश्वचषकामध्ये भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा मोठ्या सामन्याची पर्वणी मिळणार आहे. या स्पर्धेत देखील हरमनप्रीत कौर नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ पाकिस्तानला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरे; हरवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ श्रीलंकेतील कोलंबो येथे एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.
हेही वाचा : IND VS PAK : ‘PCB ला फक्त लल्लू-कट्टू…’, आशिया कपमधील पराभव जिव्हारी; शोएब अख्तरने व्यक्त केला संताप
आयसीसी महिला विश्वचषक सामने भारतातील बेंगळुरू, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि इंदूर आणि श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा : IND vs PAK : PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी सुधारण्याच्या पलीकडे! Asia cup ट्रॉफी परत करणार, पण घातली ‘ही’ अट
भारतीय महिला संघ आणि पाकिस्तानी महिला संघ ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनेसामने येऊन गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय महिला संघाने बाजी मारली आहे आणि सर्व ११ सामने जिंकले आहेत.
भारतीय महिला विश्वचषक संघ खालीलप्रमाणे
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यस्तिका भाटिया, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुण कुमारी, कुमारी गौतम, गौतम कुमारी.
पाकिस्तान महिला वनडे विश्वचषक संघ खालीलप्रमाणे
फातिमा सना (कर्णधार), मुनीबा अली सिद्दीकी (उपकर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, आयमान फातिमा, नशरा सुंधू, नतालिया परवेझ, ओमामा सोहेल, रमीन शमीम, सदफ शमास, सादिया इक्बाल, शवाल जुल्फिकार, सिदरा अमीन, सिदरा अमीन, सिद्राब नवाज (सैदराब नवाज)