शोयब अख्तर(फोटो-सोशल मिडिया)
Shoaib Akhtar scolds Pakistan team : आशिया कप २०२५ (Asia cup 2025) मध्ये भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनकच राहिली, या स्पर्धेत पाकिस्तानल भारताकडून तीन वेळा पराभव पत्करावा लागला. संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानची फलंदाजी फारच सुमार झाल्याचे दिसून आले. तर गोलंदाजी देखील अपेक्षेनुसार झालेली दिसली नाही. तसेच कर्णधार सलमान अली आघाची फलंदाजीसह कमकुवत नेतृत्व संघासाठी अडचणीचे ठरले. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीनंतर, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने चांगलाच संताप व्यक्त केला. त्याने केवळ संघाचा कर्णधार सलमान अली आघावरच नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डवरही निशाणा साधला आहे.
हेही वाचा : IND vs PAK : PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी सुधारण्याच्या पलीकडे! Asia cup ट्रॉफी परत करणार, पण घातली ‘ही’ अट
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पीसीबी आणि संघावर आपला संताप व्यक्त केला. त्याने खेळाडूंना ‘लल्लू-कट्टू’ (मुले) असे देखील म्हटले आहे. एका न्यूज एजन्सीशी बोलत असताना तो म्हणाला की पाकिस्तानला आता ‘सभ्य मुलांची’ खूप गरज आहे जी रात्री ८ वाजताच्या कर्फ्यूपूर्वी आपल्या घरी जातात. अख्तर पुढे म्हणाला की, बोर्डाला मजबूत व्यक्तिमत्त्वांपेक्षा कमकुवत व्यक्तिमत्त्व असणारे खेळाडू हवे आहेत, जे त्यांच्या धोरणांचा एक महत्वाचे भाग आहे. त्याच्याकडून असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, जर कर्णधार प्रेरणादायी राहत नाही, तेव्हा संघ योग्य दृष्टिकोन कसा विकसित करू शकतो? कर्णधार हा पीसीबीच्या निवडींचे एक प्रतिबिंब असतो.
शोएब अख्तरने संघ व्यवस्थापनावर देखील निशाणा साधला. तो म्हणाला की, संघ संयोजन आणि कर्णधारपद दोन्हीही दोषपूर्ण होते. पीसीबी त्यांचे काही एक ऐकण्यासच्या तयारीत नाही असे तो म्हणाला. अख्तर याने स्पष्ट केले की निवृत्तीनंतर त्याने कधीही पीसीबीमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. कारण तिथे गेलेल्या कोणाचाही आदर केला जात नाही. तो आता टीव्हीमध्ये काम करतो आणि पैसे कमवतो, परंतु पीसीबीला मजबूत व्यक्तिमत्त्व नको असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
आशिया कपनंतर, पाकिस्तान संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर महत्त्वाची मालिका खेळणार आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने, तीन टी-२० सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून या मालिकांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. संघात बाबर आझम, सलमान अली आगा, मोहम्मद रिझवान आणि इतर अनेक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : IND VS PAK : ‘बस झाली आता नाटकं! ACC च्या बैठकीत मोहसिन नक्वी यांच्यावर BCCI कडून होणार कारवाईची मागणी…