दुबई : आशिया कप २०२२ (Asia Cup) या स्पर्धेत सुरु असलेल्या सुपर ४ राउंड मध्ये आज गुरुवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India Vs Afganistan) यांच्यात सामना रंगणार आहे. काल बुधवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिलेलं १३० धावांचं आव्हान पाकिस्तानने अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पूर्ण केलं. आज आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना भारतासाठी आशिया कप मधील अस्तित्वाची लढाई असणार असून हा सामना भारतीय संघाला मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. साठी टीम इंडियाला आज तुफान खेळी करावी लागणार आहे.
भारतीय संघ आशिया कप मधील सुपर ४ सामन्यात कोणतीही कमाल दाखवू शकला नाही. सुपर ४ मधील पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यात रोमांचक क्षणी भारताला पराभवाची चव चाखायला मिळाली. गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी होणारा सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून याची सुरुवात सायंकाळी ७ :३० वाजता होणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघानी सुपर ४ मधील सामने जिंकून अंतिम सामन्याचे तिकीट निश्चित केले आहे. त्यामुळे भारताचे आशिया कप मधील आव्हान जवळपास संपुष्ठात आलं आहे.
असा असेल भारताचा संभाव्य संघ :
भारत संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.