IND vs WI: Where to watch India vs West Indies Test series? Now you can watch the thrill not on Sony but on 'Ya' channel
IND vs WI Test Series : आशिया कप २०२५ मधील अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत करत भारताने जेतेपदावर नाव कोरले. आता भारतीय क्रिकेट संघाच्या आत्मविश्वात चांगलीच वाढ झाली आहे. भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची मालिका खेळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही कसोटी सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहेत. ज्यामुळे प्रत्येक सामना अधिक महत्वाचा असणार आहे.
या कसोटी मालिकेचा पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बीसीसीआयकडून आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज संघाची देखील ही घोषणा करण्यात आली आहे, जरी अलिकडेच संघात काही बदल केले गेले असले तरी आता हे सामने एकतर्फी होणार की, रोमांचक? पाहणे रंजक असणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान शुभमन गिलकडे कसोटी कर्णधारपद देण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली होती. गिल हा भारतीय भूमीवर कसोटी कर्णधार म्हणून पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. तरुण गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कशी कामगिरी करणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागून असणार आहे. तर रोस्टन चेस वेस्ट इंडिजची धुरा सांभाळणार आहे.
यावेळी, तुम्हाला सोनी नेटवर्कवर भारत-वेस्ट इंडिज सामना पाहता येणार नाही. स्टार स्पोर्ट्सकडे मालिकेचे प्रसारण हक्क असणार आहेत. जर तुम्हाला टीव्हीवर सामना पाहायचा असेल तर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर बघावे लागणार आहे. मोबाइल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहणाऱ्यांसाठी, जिओ हॉटस्टार हा एक पर्याय उपलब्ध असणार आहे. तुम्ही दोन्ही कसोटी सामन्यांचे थेट प्रक्षेपण येथे पाहू शकता.
हेही वाचा : IND vs PAK : भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमनेसामने; वाचा कधी-कुठे होणार महामुकाबला?
दोन्ही कसोटी सामने सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहेत. तसेच दिवसभर खेळवले जाणार आहे. प्रेक्षकांसाठी टीम इंडियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एका नवीन आव्हानाचा सामना करताना पाहण्याची ही एक उत्तम संधी चालून आली आहे.